आपला जिल्हा

३७.९३ लाखांच्या रस्ते विकासकामांच्या निविदा प्रसिद्ध आ. आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्याला यश

३७.९३ लाखांच्या रस्ते विकासकामांच्या निविदा प्रसिद्ध
आ. आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्याला यश

कोपरगाव मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधून नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महायुती शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत ३७.९३ लाखांच्या रस्ते विकासकामांच्या निविदा प्रसिद्ध

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि ११ ऑगस्ट २०२६ : कोपरगाव मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधून नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महायुती शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. या पाठपुराव्यातून मतदारसंघात शेकडो विकासकामे पूर्ण झाली असून अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. उर्वरित विकासकामांना गती देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांतून मतदारसंघातील ३७ लाख ९३ हजार रुपयांच्या रस्ते विकासकामांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली.

जाहिरात

प्रसिद्ध झालेल्या निविदांमध्ये कोळपेवाडी येथील डॉ. जुंधारे परिसरातील रस्ता काँक्रीटीकरणासाठी १५ लाख ६७ हजार रुपये, कान्हेगाव येथील गोरख विंचू ते दत्तात्रय सांगळे वस्ती रस्ता खडीकरणासाठी १० लाख ३७ हजार रुपये, तर चासनळी येथील बारगळ वस्ती रस्ता डांबरीकरणासाठी ११ लाख ८९ हजार रुपये अशा एकूण ३७ लाख ९३ हजार रुपयांच्या कामांचा समावेश आहे.
कोपरगाव मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी आ. आशुतोष काळे यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या पाठपुराव्यामुळे अनेक रस्त्यांची कामे मार्गी लागली असून आगामी काळातही आवश्यक असलेल्या रस्ते विकासकामांना प्राधान्य दिले जाणार आहे.

जाहिरात

या रस्ते विकासकामांमुळे संबंधित गावांतील नागरिकांची दळणवळणाची अडचण दूर होण्यास मदत होणार आहे. विद्यार्थी, शेतकरी, कामगार तसेच सर्वसामान्य नागरिकांना ये-जा करणे सुलभ होणार असून शेतकऱ्यांना शेतमाल बाजारपेठेत नेण्यासाठीही मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. कोळपेवाडी, कान्हेगाव आणि चासनळी येथील नागरिकांनी या विकासकामांसाठी आ. आशुतोष काळे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे