आपला जिल्हा

कष्टाला भक्तीची जोड देत संत सावता महाराजांनी कर्मालाच ईश्वरसेवेचे रूप दिले – माजी आमदार अशोकराव काळे

कष्टाला भक्तीची जोड देत संत सावता महाराजांनी कर्मालाच ईश्वरसेवेचे रूप दिले – माजी आमदार अशोकराव काळे

कष्टाला भक्तीची जोड देत संत सावता महाराजांनी

कर्मालाच ईश्वरसेवेचे रूप दिले – माजी आमदार अशोकराव काळे

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि ११ ऑगस्ट २०२६ शेतीच्या कष्टमय जीवनातही विठ्ठलभक्तीचा ध्यास कायम ठेवत संत सावता महाराजांनी श्रम, निष्ठा आणि भक्तीचा अनोखा संगम घडवून आणला. कष्टाला भक्तीची जोड देत संत सावता महाराजांनी कर्मालाच ईश्वरसेवेचे रूप दिले, असा प्रेरणादायी संदेश त्यांच्या जीवनकार्यातून आजही समाजाला मिळतो  असे प्रतिपादन माजी आमदार अशोकराव काळे यांनी केले.

जाहिरात

वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोपरगाव शहरातील श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिरात माजी आमदार अशोकराव काळे यांनी संत शिरोमणी सावता महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, संत शिरोमणी सावता महाराजांनी आपल्या आचरणातून कष्ट, भक्ती आणि प्रामाणिक कर्म यांचा सुंदर संगम समाजासमोर ठेवला आहे. शेतात राबतांना मुखी विठ्ठलाचे नामस्मरण आणि मनात अखंड ईश्वरभक्ती ठेवून त्यांनी कर्मालाच परमेश्वराची सेवा मानली.

जाहिरात

“कांदा मुळा भाजी,अवघी विठाई माझी” या अभंगातून त्यांनी दैनंदिन कष्टातही विठ्ठलाचे दर्शन घडवत
त्यांनी श्रमाला प्रतिष्ठा देत कोणतेही काम लहान-मोठे नसते, हा महान संदेश समाजाला दिला. शेतात राबत असतानाही ईश्वरभक्ती कशी करावी याचा नवा आदर्श त्यांनी समाजासमोर ठेवला. त्यांचा हा कर्मयोगाचा आणि समतेचा संदेश आजच्या युगातही अत्यंत प्रेरणादायी असून आपले कर्म करीत असतांना पांडुरंगाचे नाम चिंतन करायला हवे. प्रामाणिक कष्टसामाजिक समता आणि ईश्वरनिष्ठा यांचा मेळ म्हणजे संत सावता महाराजांचे जीवन असून आजच्या आधुनिक काळात तरुण पिढीने संत सावता महाराजांच्या तत्त्वज्ञानाचा अंगीकार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

जाहिरात

यावेळी माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळेरवीकाका बोरावकेकर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनार कुदळेमाजी नगरसेवक विरेन बोरावकेसौ.कांचनताई बोरावकेसौ. अरुणाताई ताम्हाणेतुषार ससाणेप्रदीप नवलेप्रकाश रासकरबापूसाहेब इनामकेविशाल राऊतसतिश भुजबळराजेंद्र खैरनारवैभव गिरमेसुमित भोंगळेविजय वढणेसचिन ससाणेप्रशांत मोरेशैलेश गाडेकरनंदकुमार शिवरकररविंद्र चौधरीबाबासाहेब घोरपडेविलास ताम्हाणेमहेंद्र बोरावकेसुमित जगझापनितीन भुजबळमंगेश झगडेराहुल बनकरवाल्मिक बारस्करओंकार वढणेशाम गिरमेचंद्रकांत शिवरकरगिरीश हिवाळेशेखर बोरावकेअक्षय गिरमेनगरसेवक जनार्दन कदमविजय त्रिभुवनसोमनाथ आढावबाळासाहेब रुईकरमाजी नगरसेवक रमेश गवळीफकीरमामु कुरेशीदिनकर खरेगणेश बोरुडेमुकुंद भूतडासुनिल फंडप्रशांत वाबळेधनराज जाधवमयूर शिंदेसंजय दुशिंगधनराज जाधवप्रविण कुऱ्हाडेगणेश गोसावी आदींसह समाजबांधव उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे