आपला जिल्हा

गोदावरी तीरावर महिला भाविकांसाठी चेंजिंग रूम उभारावी,संजीवनी युवा प्रतिष्ठानची नगराध्यक्ष पराग संधान यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

गोदावरी तीरावर महिला भाविकांसाठी चेंजिंग रूम उभारावी,संजीवनी युवा प्रतिष्ठानची नगराध्यक्ष पराग संधान यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
गोदावरी तीरावर महिला भाविकांसाठी चेंजिंग रूम उभारावी,संजीवनी युवा प्रतिष्ठानची नगराध्यक्ष पराग संधान यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
Kopargaon vijay kapse दि १२ ऑगस्ट २०२६ – पवित्र श्रावण महिन्यात गोदावरी नदीवर स्नानासाठी येणाऱ्या हजारो महिला भाविकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन कोपरगाव शहरातील गोदावरी तीराच्या दोन्ही बाजूंना महिलांसाठी स्वतंत्र चेंजिंग रूम उभारण्यात याव्यात, अशी मागणी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या युवा सेवकांनी नगराध्यक्ष पराग संधान यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

जाहिरात
निवेदनात म्हटले आहे की,पवित्र श्रावण महिन्यात कोपरगाव तालुक्यासह परिसरातील विविध गावांमधून मोठ्या संख्येने भाविक गोदावरी नदीत पवित्र स्नानासाठी येतात. गोदावरी नदीवरील स्व. सूर्यभान वहाडने पाटील घाट परिसरात प्रत्येक श्रावणी सोमवारी भाविकांची मोठी गर्दी होत असते. याच ठिकाणी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी भव्य गंगाआरतीचे आयोजन करण्यात येत असल्याने भाविकांचा मोठा ओघ असतो.

जाहिरात
मात्र, स्नानानंतर कपडे बदलण्यासाठी महिलांसाठी कोणतीही स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध नसल्याने माता-भगिनींना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतो.त्यामुळे गोदावरी तीराच्या दोन्ही बाजूंना महिलांसाठी कायमस्वरूपी चेंजिंग रूम उभारण्यात याव्यात, अशी प्रमुख मागणी निवेदनातून करण्यात आली.

जाहिरात
याशिवाय, गोदावरीवरील लहान पुलावरील कठडे व बॅरेकेटिंगची तातडीने दुरुस्ती करून भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात. श्रावणी सोमवारी होणाऱ्या गंगाआरतीच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छता, प्रकाश व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा, कचरा व्यवस्थापन तसेच इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशीही मागणी करण्यात आली. तसेच नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव येथे गोदावरी तीरावर कायमस्वरूपी स्नानगृहे व महिलांसाठी चेंजिंग रूमची सुविधा उभारण्यात यावी, अशीही विनंती निवेदनातून करण्यात आली.नगराध्यक्ष पराग संधान यांनी निवेदन स्वीकारून मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत संबंधित विभागामार्फत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.यावेळी संजीवनी युवा प्रतिष्ठानचे सर्व युवा सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक आमदार विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सामाजिक, धार्मिक व जनहिताचे उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. महिला भाविकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी करण्यात आलेली ही मागणीही त्याच सामाजिक बांधिलकीचा एक भाग असल्याचे यावेळी प्रतिष्ठानच्या युवा सेवकांनी सांगितले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे