आपला जिल्हा

आदिवासी विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून ती शिक्षणाच्या बळावर साकारावीत : आ. विवेक कोल्हे

आदिवासी विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून ती शिक्षणाच्या बळावर साकारावीत : आ. विवेक कोल्हे

 

संजीवनीच्या एकलव्य आदिवासी आश्रमशाळेत जागतिक आदिवासी दिन उत्साहात

Kopargaon vijay kapse दि १२ ऑगस्ट २०२६: आदिवासी विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत आणि शिक्षणाच्या बळावर ती साकार करावीत. संजीवनीसारख्या संस्थेचे पाठबळ घेऊन भविष्यात देशातील उच्च पदांवर पोहोचत कोपरगाव तालुक्याचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन विधान परिषद सदस्य आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी केले.

जाहिरात

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित टाकळी येथील एकलव्य आदिवासी अनुदानित आश्रमशाळेत जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आ. कोल्हे बोलत होते. शासकीय व अनुदानित आश्रमशाळांसमोरील विविध प्रश्नांकडे जातीने लक्ष घालून त्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

जाहिरात

आदिवासी संस्कृती, कला व परंपरांचे जतन करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला शिक्षणाची जोड देण्याचा संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचा दृष्टिकोन या कार्यक्रमातून अधोरेखित झाला. आ. कोल्हे यांनी संजीवनीच्या कार्यपरंपरेचा गौरव करताना स्वर्गीय सहकारमहर्षी माजी मंत्री शंकररावजी कोल्हे यांनी समाजकारण व शिक्षण क्षेत्रात निर्माण केलेला वसा आज अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वस्त सुमित कोल्हे तळमळीने पुढे नेत असल्याचे सांगितले.

जाहिरात

आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व योग्य संधी मिळाल्यास ते राष्ट्रीय पातळीवर स्वतंत्र ओळख निर्माण करू शकतात, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या वारली चित्रांमधून आदिवासी समाजाच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरा व कला वैभवाचे दर्शन घडले. शिक्षणामुळे जीवनात झालेला सकारात्मक बदल आणि भविष्यातील ध्येयांविषयी विद्यार्थ्यांनी केलेली भाषणेही लक्षवेधी ठरली.

यावेळी श्री. सुमित कोल्हे यांनी एकलव्य आश्रमशाळेच्या भविष्यातील विकासाची दिशा स्पष्ट केली. संजीवनीच्या इतर शाखांप्रमाणेच टाकळी येथील आश्रमशाळेतही दर्जेदार सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षणासोबत क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम व व्यक्तिमत्त्व विकासाच्या संधी उपलब्ध करून देत एकलव्य आश्रमशाळेला आदिवासी विद्यार्थ्यांच्या विकासाचे आदर्श रोल मॉडेल बनविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमास सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक निलेश देवकर, श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शिवाजीराव लहारे, टाकळीचे सरपंच संदीप देवकर, माजी सभापती सुनील देवकर, पोलीस पाटील राजेंद्रजी देवकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक आण्णासाहेब टकले, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मीरा जोशी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, आदिवासी पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे