आपला जिल्हा

कोपरगावात कोल्हे गटाला हादरा… उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांचे पद रद्द ,६ वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी

कोपरगावात कोल्हे गटाला हादरा… उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांचे पद रद्द ,६ वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी

कोपरगावात कोल्हे गटाला हादरा… उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांचे पद रद्द ,६ वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि १३ ऑगस्ट २०२६:-पालिकेच्या राजकारणात सत्ताधारी कोल्हे गटाला जबरदस्त हादरा बसला.  या गटाचे उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरले. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी त्यांचे नगरसेवकपद रद्द ठरवीले. तसेच जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या निर्णयानुसार रणशूर यांच्यावर पुढील सहा वर्षे निवडणूक लढविण्यासही बंदी घालण्यात आली. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सागर आहेर यांच्या वतीने अॅड. मुन्ना सय्यद यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जाहिरात

पालिका निवडणुकीला एक वर्ष पूर्ण व्हायच्या आतच काळे गटाकडून कोल्हे गटाला हा मोठा धक्का देण्यात आला. पालिका निवडणुकीत रणशूर यांनी प्रभाग क्रमांक ९ ‘अ’ मधील अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव जागेवरून निवडणूक लढविली होती. यावेळी त्यांनी एस.सी.-३७ प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र सादर केले होते. या प्रमाणपत्राच्या वैधतेवर सागर आहेर यांनी आक्षेप घेतला होता. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली होती.  समितीने संबंधित कागदपत्रांची चौकशी व छाननी केली. त्यामध्ये रणशूर यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र अवैध ठरवीले. जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर सागर आहेर यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्याकडे अर्ज करून उपनगराध्यक्ष रणशूर यांना नगरसेवकपदावरून अपात्र ठरविण्याची मागणी केली होती.

जाहिरात

या अर्जाची सुनावणी करतांना जिल्हाधिकाऱ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा अहवाल तसेच संबंधित कायदेशीर बाबींची दखल घेत उपनगराध्यक्ष रणशूर यांना नगरसेवकपदावर राहण्यास अपात्र ठरविले. त्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द झाले आहे. दरम्यानया निर्णयामुळे कोपरगाव पालिकेच्या राजकारणात खळबळ उडाली . काळे गटाने कोल्हे गटाला दिलेला हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

अॅड. मुन्ना सय्यद

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे