थोरात कारखाना कार्यस्थळावर १३ ऑगस्टपासून अखंड हरिनाम सप्ताह

थोरात कारखाना कार्यस्थळावर १३ ऑगस्टपासून अखंड हरिनाम सप्ताह
सलग ४१व्या वर्षी ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा; विविध संत-महंतांची कीर्तन व प्रवचन सेवा

Sangmner vijay kapse दि १२ ऑगस्ट २०२६: सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील अमृतेश्वर मंदिर प्रांगणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार, दि. १३ ते गुरुवार, दि. २० ऑगस्ट २०२६ या कालावधीत ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सलग ४१व्या वर्षी आयोजित या भक्तिमय सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर व सांस्कृतिक मंडळाचे कार्याध्यक्ष रामदास तांबडे यांनी केले आहे.
वै. स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य ह.भ.प. रामभाऊ महाराज गावडे यांच्या प्रेरणेने, ह.भ.प. गुरुवर्य कलामाई यांच्या कृपाशीर्वादाने तसेच ह.भ.प. गोविंद महाराज करंजकर व ह.भ.प. चंद्रलेखाताई काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह होत आहे.

सप्ताहाची घटस्थापना गुरुवार, दि. १३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता पांडुरंग घुले व त्यांच्या सुविद्य पत्नी प्रतिभाताई पांडुरंग घुले यांच्या शुभहस्ते होणार आहे. सप्ताहकाळात दररोज सकाळी ५ ते ६ काकड भजन, ८ ते ११ ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण, ११ ते १२ गाथा भजन, सायंकाळी ४.३० ते ५.३० सामुदायिक हरिपाठ, ५.३० ते ६.३० ज्ञानेश्वरी प्रवचन, तर सायंकाळी ७ ते ९ हरिकीर्तन व त्यानंतर हरिजागर असा धार्मिक कार्यक्रम होणार आहे.
दररोज ज्ञानेश्वरी अध्याय प्रवचनाची सेवा ह.भ.प. हिराबाई जोंधळे (संगमनेर), ह.भ.प. सौ. सोनालीताई नरोडे (सायखिंडी), ह.भ.प. शशिकलाताई सूर्यवंशी (संगमनेर), ह.भ.प. मीनाताई सुपेकर (घुलेवाडी), ह.भ.प. आशाताई वर्पे (आळंदी), ह.भ.प. अलकाताई मोहटे (आळंदी) व ह.भ.प. चंद्रलेखाताई काकडे (संगमनेर) करणार आहेत.

कीर्तन सेवेत गुरुवार दि. १३ रोजी जयश्रीताई तिकांडे (राजापूर), शुक्रवार दि. १४ रोजी ह.भ.प. जगन्नाथ महाराज उंबरकर (उंबरी), शनिवार दि. १५ रोजी ह.भ.प. शरद महाराज ढवळे (काकडवाडी), रविवार दि. १६ रोजी ह.भ.प. अरुण महाराज फरगडे (निमगाव पागा), सोमवार दि. १७ रोजी ह.भ.प. व्यंकटेश महाराज सोनवणे (निमगाव भोजापूर), मंगळवार दि. १८ रोजी ह.भ.प. गोविंद महाराज करंजकर (बीड) आणि बुधवार दि. १९ रोजी सुदाम महाराज कोकणे (धांदरफळ) यांची सेवा होणार आहे.
गुरुवार, दि. २० ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत कथा प्रवक्ते व कीर्तनकार ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील (बुलढाणा) यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे.
दरम्यान, बुधवार, दि. १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात व सौ. कांचनताई बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होणार आहे. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, सौ. दुर्गाताई तांबे, आमदार सत्यजित तांबे, इंद्रजितभाऊ थोरात, डॉ. जयश्रीताई थोरात, व्हा. चेअरमन पांडुरंग पा. घुले यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक मंडळ उपस्थित राहणार आहे.
या अखंड हरिनाम सप्ताहाचा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक मंडळाचे उपाध्यक्ष व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, कार्याध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार तसेच सांस्कृतिक मंडळाच्या सर्व संचालकांनी केले आहे.




