आपला जिल्हा

एस.एस.जी.एम. महाविद्यालयात पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन

एस.एस.जी.एम. महाविद्यालयात पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन

एस.एस.जी.एम. महाविद्यालयात पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन

Kopargaon vijay kapse दि १४ ऑगस्ट २०२६ : रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स व संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमीअंतर्गत ‘बुद्धिमत्ता घटकावर सखोल मार्गदर्शन’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. भागवत बैरागी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे होते.

जाहिरात

प्रमुख मार्गदर्शक प्रा. भागवत बैरागी यांनी बुद्धिमापन घटकातील विविध प्रश्न व उदाहरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. करिअरची निवड करताना क्षेत्राची आवड आणि स्वतःची क्षमता यांचा विचार करावा. दररोजचा सराव, वेळेचे अचूक नियोजन आणि आत्मविश्वासाच्या जोरावर ध्येय निश्चितपणे गाठता येते, असे त्यांनी सांगितले.

जाहिरात

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. माधव सरोदे म्हणाले, “पोलीस भरती परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. कमी वेळेत जास्तीत जास्त प्रश्न अचूकपणे सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांनी नियमित सराव करणे आवश्यक आहे. करिअरचे ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत.”

जाहिरात

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. माधव रेवगडे यांनी केले. पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमीचे चेअरमन श्री. संदीप शिंदे यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रमुख मार्गदर्शक प्रा. भागवत बैरागी यांचा परिचय करून दिला.

जाहिरात

कार्यक्रमास महाविद्यालयाच्या ज्युनिअर विभागातील प्राध्यापक तसेच पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सौ. जयश्री शेंडगे व सौ. ज्योती लामखडे यांनी केले, तर आभार ज्युनिअर विभागाचे प्रभारी उपप्राचार्य श्री. रवींद्र हिंगे यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे