आपला जिल्हा

डी पॉल पब्लिक स्कूलमध्ये ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात

डी पॉल पब्लिक स्कूलमध्ये ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात

डी पॉल पब्लिक स्कूलमध्ये ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात

Kopargaon vijay kapse दि १५ ऑगस्ट २०२६: डी पॉल पब्लिक स्कूल, कोपरगाव येथे भारताचा ८०वा स्वातंत्र्यदिन देशभक्तीपूर्ण वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ब्राह्मणगाव ग्रामपंचायतीचे सरपंच मा. अनुराग प्रभाकर येवले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीताने संपूर्ण परिसर देशभक्तीच्या भावनेने भारावून गेला.

जाहिरात

कार्यक्रमाची सुरुवात कु. उत्कर्ष वक्ते यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. कु. प्लक्षा दिवे व कु. सर्वस्वी गायकवाड यांनी प्रभावी सूत्रसंचालन करत कार्यक्रमाची रंगत वाढवली.

यावेळी विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व सांगणारी देशभक्तीपर भाषणे सादर केली. चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या मनमोहक भाषणांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. विद्यार्थ्यांनी सादर केलेली देशभक्तीपर गीते व नृत्ये कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.

जाहिरात

प्रमुख पाहुणे मा. अनुराग प्रभाकर येवले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वातंत्र्याचे महत्त्व, देशाप्रती असलेली जबाबदारी आणि जबाबदार नागरिक म्हणून घडण्याची गरज याबाबत प्रेरणादायी विचार मांडले.

शाळेचे मुख्याध्यापक रेव्ह. फा. सॅंटो थॉमस यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून स्वातंत्र्यदिनाचा ऐतिहासिक संदर्भ, स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान आणि आजच्या पिढीची देशाप्रती असलेली कर्तव्ये यांचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी देशाच्या प्रगतीसाठी जबाबदार, शिस्तप्रिय व संवेदनशील नागरिक बनावे, असे आवाहन त्यांनी केले.

जाहिरात

कार्यक्रमाच्या शेवटी कु. त्रिशा वडांगळे हिने आभार प्रदर्शन केले. तसेच उपमुख्याध्यापक श्री. पृथ्वीपाल चिरायथ सर यांनी प्रमुख पाहुणे, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशभक्तीपर गीते, विद्यार्थ्यांची भाषणे आणि सांस्कृतिक सादरीकरणामुळे संपूर्ण कार्यक्रमाला उत्साहाची व देशप्रेमाची किनार लाभली. उत्साहपूर्ण वातावरणात स्वातंत्र्यदिन सोहळ्याची सांगता झाली.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे