आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल येवला येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल येवला येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात
आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल येवला येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात
Yeola vijay kapse दि १७ ऑगस्ट २०२६ : विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट, कोकमठाण संचलित आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल, येवला येथे संस्थेचे अध्यक्ष हनुमंत भोंगळे यांच्या मार्गदर्शन व प्रेरणेतून भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन देशप्रेमाने ओतप्रोत वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमास उपाध्यक्ष हेमंत शाह, पी.आर.ओ. प्रमोद शेलार, प्राचार्य तुषार कापसे, कंकाली बाबा तसेच पालक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता व क्रांतिकारकांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. देशभक्तीपर गीतांनी परिसर भारावून गेला.

इयत्ता नर्सरी ते दुसरीच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक व देशभक्तीपर वेशभूषा परिधान करून सांस्कृतिक कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. आराध्या भोसले, प्रांश माळोकर, मायरा गुजराती, यशस्वी धनवटे, सानवी भावसार, शार्विल झोंड, ओजस्वी माळोकर, देवांशी भुसे, रुद्र माळोकर, त्रिशा कंदलकर, श्रीजा लचके, ओवी नाईक, प्रीती खैरनार, शिवांश पवार, आद्विक काबरा, अद्विका शिंदे, स्वरा वाघ, कणक नाशिककर, मृणाली राठोड, आरुषी सागर, भैरवी नागपुरे, शौर्य साळवे, अनघा उदावंत, चैतन्या हिरे, अश्विनी खोकले, शिव अहिरे, राजनंदिनी शेरकर, ज्ञानेश्वरी पाटील, समीक्षा जोरी, कावेरी खिराडकर आणि शमिका पावटेकर या विद्यार्थ्यांनी भाषणातून देशभक्तीची भावना व्यक्त केली.

रुद्र माळोकर, मितांश वटाणे, दर्शनी करपे, श्रेयस पवार व धनश्री रोहिलवाड या चिमुकल्यांनी सुंदर नाटिका सादर केली. तसेच स्वरा तूपसाखरे, देवश्री भावसार, गीतांजली जगझाप, मोक्षा वडे, प्रांजल नागपुरे, काव्या कटारे, संस्कृती जगताप, ईश्वरी धनवटे, नंदिनी दालकरी व संस्कृती जाधव यांनी देशभक्तीपर नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
यावेळी हेमंत शाह व प्रमोद शेलार यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्राचार्य तुषार कापसे यांनीही शुभेच्छा देत आपल्या मनोगतात स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व स्पष्ट केले आणि विद्यार्थ्यांनी सुजाण व जबाबदार नागरिक बनण्याचा संदेश दिला. चित्रलेखा परदेशी यांनी स्वातंत्र्य दिनाविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा शिंदे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.



