आपला जिल्हा

श्रीरामपूर मधील दरोड्याचा फरार आरोपी कोपरगाव पोलिसांच्या ताब्यात

श्रीरामपूर मधील दरोड्याचा फरार आरोपी कोपरगाव पोलिसांच्या ताब्यात

श्रीरामपूर मधील दरोड्याचा फरार आरोपी कोपरगाव पोलिसांच्या ताब्यात

Kopargaon vijay kapse दि १७ ऑगस्ट २०२६: श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला कोपरगाव तालुका पोलिसांनी शिताफीने पकडले. कार्तिक गुलाब निकम (रा. माहेगाव देशमुख, ता. कोपरगाव) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे.

जाहिरात

दि. १६ ऑगस्ट रोजी माहेगाव देशमुख गावात संशयित इसम फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलिसांचे पथक माहेगाव देशमुख येथे रवाना झाले. गणपती मंदिराच्या मागे एक इसम पोलिसांना पाहून लपताना आढळून आला. पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव कार्तिक गुलाब निकम असल्याचे सांगितले.

जाहिरात

पोलिसांनी त्याची चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम १२२ नुसार कारवाई करण्यात आली. त्यानंतर त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती घेतली असता श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात पोस्टे गुन्हा रजिस्टर क्रमांक १०२/२०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१०(२), ३३१(६) अन्वये दाखल असलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यात तो फरार आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.

जाहिरात

सदर गुन्ह्यात दि. १ मार्च २०२५ रोजी रात्री सुमारे १ वाजता फिर्यादी विजयादेवी लक्ष्मणराव भोपळे (वय ७९, रा. खानापूर, ता. श्रीरामपूर) यांच्या घरात सहा अनोळखी इसमांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत प्रवेश केला होता. आरोपींनी फिर्यादीला कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील तसेच घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ९ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल दरोडा टाकून चोरून नेला होता.

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपी कार्तिक निकम याच्या साथीदारांना अटक करण्यात आली होती. मात्र कार्तिक निकम हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. कोपरगाव तालुका पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला श्रीरामपूर तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे व उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी, पोलीस कर्मचारी रशीद शेख, प्रकाश नवाळी, सागर शेवाळे, अनिल फाटके व होमगार्ड अमोल तासकर यांच्या पथकाने केली.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे