आपला जिल्हा

मा.आ.अशोकदादा काळे यांच्या वाढदिवसानिमित्त गौतम पब्लिक स्कूलमध्ये वृक्षारोपण

मा.आ.अशोकदादा काळे यांच्या वाढदिवसानिमित्त गौतम पब्लिक स्कूलमध्ये वृक्षारोपण

विद्यार्थ्यांच्या सहभागातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; २०१० पासूनची वृक्षारोपणाची परंपरा कायम

Kopargaon vijay kapse दि २१ ऑगस्ट २०२६–  कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूल, गौतमनगर येथे संस्थेचे चेअरमन व कोपरगावचे माजी आमदार अशोकदादा काळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. संस्थेच्या सचिव सौ. चैतालीताई काळे आणि विश्वस्त आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शाळेचे प्राचार्य नूर शेख यांच्या पुढाकाराने या पर्यावरणपूरक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

जाहिरात

सन २०१० पासून अशोकदादा काळे यांच्या वाढदिवसानिमित्त गौतम पब्लिक स्कूलमध्ये वृक्षारोपणाची परंपरा सुरू आहे. ही परंपरा आजही अविरतपणे सुरू ठेवत यंदाही स्काऊट-गाईड आणि एनसीसीच्या विद्यार्थ्यांच्या सहभागातून शाळा परिसरात झाडे लावण्यात आली. गौतम पब्लिक स्कूलमध्ये सन २०१० पासून माजी आ. अशोकराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्याची परंपरा अखंडपणे सुरू असून यंदाही ही परंपरा कायम ठेवण्यात आली. विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करून झाडांचे संगोपन, पर्यावरणाचे संरक्षण आणि भावी पिढ्यांसाठी हरित परिसर निर्माण करण्याचा संकल्प व्यक्त केला. स्काऊट शिक्षक नसिर पठाण आणि एन.सी.सी. टी.ओ. इसाक सय्यद  यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

जाहिरात

वृक्षारोपणाच्या समारोपप्रसंगी बोलताना संस्थेचे इन्स्पेक्टर नारायण बारे म्हणाले कि, जमिनीची धूप रोखण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आज वृक्षलागवड ही काळाची गरज बनली आहे. गौतम पब्लिक स्कूलमध्ये सन २०१० पासून मा. आ. अशोकराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांच्या सहभागातून सातत्याने राबविण्यात येणारा हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी प्रेम, जाणीव आणि सामाजिक जबाबदारीची भावना रुजविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जाहिरात

झाडे लावा, झाडे जगवा आणि पर्यावरण वाचवा या संदेशाने कार्यक्रमाचा समारोप झाला. कार्यक्रमासाठी क्रीडा प्रमुख रमेश पटारे, माध्यमिक पर्यवेक्षिका ज्योती शेलार मॅडम, प्राथमिक पर्यवेक्षक राजेंद्र आढाव, सॅनिटेशन विभागाचे सोनू जाधव आणि शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे