सोमैय्या महाविद्यालयात स्व. विलासराव देशमुख यांची पुण्यतिथी साजरी

सोमैय्या महाविद्यालयात स्व. विलासराव देशमुख यांची पुण्यतिथी साजरी
सोमैय्या महाविद्यालयात स्व. विलासराव देशमुख यांची पुण्यतिथी साजरी
Kopargaon vijay kapse दि २४ ऑगस्ट २०२६ : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या १४व्या पुण्यतिथीनिमित्त के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे अध्यक्षस्थानी होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, “कै. विलासराव देशमुख हे महाराष्ट्र राज्याच्या तसेच देशाच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अत्यंत बुद्धिमान, अभ्यासू आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी महाराष्ट्राचे दोन वेळा मुख्यमंत्रीपद भूषविले. त्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम, सांस्कृतिक आदी विविध खात्यांचे मंत्री म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय काम केले. केंद्रीय राजकारणात गेल्यानंतरही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला. गावपातळीवरील राजकारणातून राष्ट्रीय स्तरावर पोहोचलेले विलासराव देशमुख हे देशातील महत्त्वाच्या राजकीय व्यक्तिमत्त्वांपैकी एक होते. त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहील.”

प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनीही स्व. विलासराव देशमुख यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकला. प्रारंभी स्व. विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करत आदरांजली वाहण्यात आली.

कार्यक्रमास कला शाखाप्रमुख डॉ. जिभाऊ मोरे, वाणिज्य शाखाप्रमुख डॉ. संतोष पगारे, रजिस्ट्रार डॉ. ए. सी. नाईकवाडे, आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. गणेश शिंदे, राष्ट्रीय सण उत्सव समिती प्रमुख प्रा. एस. एस. नागरे, डॉ. एस. एम. देवरे यांच्यासह वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन सेवकवृंद तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.



