आपला जिल्हा

प्रवरा परिवाराची ३६ वर्षांची पुरस्कार परंपरा कायम; उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या उपस्थितीत गुरुवारी सोहळा

प्रवरा परिवाराची ३६ वर्षांची पुरस्कार परंपरा कायम; उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या उपस्थितीत गुरुवारी सोहळा

प्रवरा परिवाराची ३६ वर्षांची पुरस्कार परंपरा कायम; उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या उपस्थितीत गुरुवारी सोहळा

Loni vijay kapse दि २४ ऑगस्ट २०२६ : सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांच्या १२६ व्या जयंती दिनानिमित्त राज्यस्तरीय साहित्य, नाट्य, कला आणि समाजप्रबोधन क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा गुरुवार, दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १ वाजता प्रवरानगर येथील डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार आणि ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वासराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होणार असल्याची माहिती पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे-पाटील यांनी दिली.

जाहिरात

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रवरा परिवाराच्या वतीने साहित्य, नाट्य व कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा त्यांच्या नावाने पुरस्कार देऊन गौरव करण्याची परंपरा सुरू करण्यात आली. यंदा या पुरस्कारांचे ३६ वे वर्ष असून, प्रवरा परिवाराने ही परंपरा अखंडितपणे जपली आहे.

जाहिरात

सहकार चळवळीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांच्या दूरदृष्टीच्या विचारांमुळे सहकार क्षेत्राने मोठी प्रगती केली. या चळवळीला साहित्य, कला व समाजप्रबोधन क्षेत्राची जोड मिळावी, या उद्देशाने लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे-पाटील यांनी साहित्य व कलाक्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देण्याची संकल्पना सुरू केली. गेल्या ३६ वर्षांत साहित्य, नाट्य, कला आणि प्रबोधन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या असंख्य मान्यवरांना या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

जाहिरात

यंदाच्या पुरस्कार निवड समितीने ‘पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील साहित्य जीवनगौरव पुरस्कार’ नाशिक येथील उत्तम कांबळे यांना जाहीर केला आहे. तसेच ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार’ संहिता राजन (पुणे), ‘पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील राज्यस्तरीय विशेष साहित्य पुरस्कार’ सुरेंद्र दरेकर (पुणे), ‘डॉ. विखे-पाटील राज्यस्तरीय कलागौरव पुरस्कार’ तमाशा कलेतील योगदानाबद्दल मालती इनामदार (नारायणगाव), ‘डॉ. विखे-पाटील राज्यस्तरीय नाट्यसेवा पुरस्कार’ सचिन शिंदे (नाशिक), तर ‘डॉ. विखे-पाटील राज्यस्तरीय समाजप्रबोधन पुरस्कार’ मराठी अभ्यास परिषद (पुणे) या संस्थेला प्रदान करण्यात येणार आहे.

सुजय विखे

याशिवाय ‘पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील अहिल्यानगर जिल्हा साहित्य पुरस्कार’ निवृत्ती जोरी (संगमनेर) आणि ‘डॉ. विखे-पाटील प्रोत्साहनपर साहित्य पुरस्कार’ संजय गोर्डे (संगमनेर) यांना देण्यात येणार असल्याचे डॉ. सुजय विखे-पाटील यांनी सांगितले.

साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वासराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्यास जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के-पाटील यांच्यासह राजकीय, सामाजिक, सहकार आणि साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या पुरस्कार वितरण सोहळ्याची प्रवरा परिवाराच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली असून, सहकार चळवळीतील कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच साहित्यप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रवरा परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे