आपला जिल्हा

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते निझरनेश्वर व खांडेश्वर महादेवाची पूजा

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते निझरनेश्वर व खांडेश्वर महादेवाची पूजा

संगमनेर तालुक्यातील महादेव देवस्थानांना आदर्श स्वरूप देण्यासाठी सातत्याने निधी दिला — बाळासाहेब थोरात

राज्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत; सर्वत्र चांगला पाऊस होण्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना

Sangmner vijay kapse दि २४ ऑगस्ट २०२६ : यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने धरणे व जलसाठे भरले आहेत. मात्र, मागील काही दिवसांपासून राज्यभरात पावसाने ओढ दिल्याने पिके सुकू लागली असून शेतकरी व नागरिक चिंतेत आहेत. राज्यात सर्वत्र चांगला पाऊस होऊन शेतकरी, नागरिक सुखी-समाधानी व आनंदी होऊ दे, अशी प्रार्थना महाराष्ट्राचे माजी कृषिमंत्री तथा ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी निझरनेश्वर व खांडेश्वर महादेवाच्या चरणी केली.

जाहिरात

दुसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त कोकणगाव, निझरनेश्वर व खांडगाव येथे बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते महादेवाचा अभिषेक व पूजा करण्यात आली. यावेळी खांडगाव येथील खांडेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष लहानभाऊ गुंजाळ, ॲड. मधुकर गुंजाळ, दूध संघाचे संचालक रमेश गुंजाळ, सचिव अशोक गुंजाळ, सरपंच विकास गुंजाळ, चेअरमन संजय गुंजाळ, अर्चनाताई बालोडे, कमल अरगडे, कैलास गोसावी, भागवत अरगडे, शिवाजी वरपे, शुभम शिंदे, कपिल गुंजाळ, संदीप गुंजाळ, महेश गुंजाळ, दशरथ बालोडे, विठ्ठल गुंजाळ, रवी खरे, आप्पा गुंजाळ आदी उपस्थित होते.

जाहिरात

निझरनेश्वर येथे माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड, देवस्थानचे अध्यक्ष बबन पवार, शिवाजी जोंधळे, सुखदेव जोंधळे, भाऊसाहेब जोंधळे, सरपंच आशाताई जोंधळे, हनुमंत जोंधळे, हौशीराम पारधी, सोमनाथ जोंधळे, भीमाशंकर जोंधळे, विलास जोंधळे, योगेश भोसले, दिलीप जोंधळे, गंगाधर वायकर, बाळासाहेब जोंधळे, दगडू जोंधळे, गोपीनाथ पानसरे, निलेश जोंधळे, सुनील गडगे, अनिल गायकवाड, रावसाहेब जम्बुकर आदी उपस्थित होते. यावेळी खांडेश्वर देवस्थान ट्रस्ट व निझरनेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने बाळासाहेब थोरात यांचा सत्कार करण्यात आला.

जाहिरात

यावेळी बोलताना थोरात म्हणाले की, संगमनेर तालुका विस्ताराने मोठा असून तालुक्यात निझरनेश्वर, खांडेश्वर, रामेश्वर, बाळेश्वर, दुधेश्वर, अमृतेश्वर यांसह गावागावांतील महादेवाची मंदिरे श्रद्धेची मोठी केंद्रे आहेत. श्रावण महिन्यात या सर्व देवस्थानांवर भाविकांची मोठी गर्दी होत असते. तालुक्यातील प्रत्येक गावातील तसेच प्रमुख देवस्थानांच्या विकासासाठी आपण सातत्याने निधी उपलब्ध करून दिला असून, भाविकांना आवश्यक सुविधा मिळाव्यात यासाठी पाठपुरावा केला आहे.

संगमनेर तालुक्यातील १७१ गावांमध्ये विकासकामे राबविण्यात आली आहेत. वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा असलेल्या या तालुक्यात धार्मिक व आध्यात्मिक वातावरण आहे. श्रावण महिना हा भक्ती आणि आनंदाचा महिना असून, भाविक मोठ्या श्रद्धेने विविध महादेव मंदिरांमध्ये दर्शनासाठी येतात. देवस्थान व्यवस्थापनांकडून भाविकांची चांगली व्यवस्था केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावर्षी अल निनोचा धोका वर्तविण्यात आला होता. सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने दिलासा मिळाला; मात्र मागील पंधरा दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत पावसाने ओढ दिली आहे. काही ठिकाणी अद्याप अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी व नागरिक चिंतेत आहेत. राज्यात तसेच देशभरात सर्वत्र चांगला पाऊस होऊन शेतकरी व नागरिक सुखी-समाधानी राहावेत, अशी प्रार्थना थोरात यांनी यावेळी केली. यावेळी भाविक, ग्रामस्थ, युवक, कार्यकर्ते व विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे