यशोधनच्या पाठपुराव्यामधून बांधकाम कामगारांच्या खात्यावर १० कोटी – इंद्रजीत थोरात

यशोधन जनसंपर्क कार्यालयातून असंघटित कामगारांच्या फॉर्मसह सर्व सुविधा दिल्याने नागरिकांना दिलासा

याबाबत अधिक माहिती देताना इंद्रजीत भाऊ थोरात म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी तालुक्याच्या विकासाबरोबर गोरगरीब माणसांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा याकरता सातत्याने काम केले आहे. वाडी वस्तीवरील वृद्ध नागरिक, निराधार, विधवा महिला यांच्याकरता शासन योजनांचा लाभ मिळवून दिला याचबरोबर तालुक्यामध्ये असलेल्या असंघटित व घरेलू कामगारांकरता शासकीय योजनांचा लाभ मिळावा याकरता स्वतंत्र विभाग कार्यान्वित केला.

या विभागामध्ये अद्यावत सुविधा असून चार कर्मचारी पूर्णवेळ काम करत आहे मागील सहा वर्षांमध्ये सुमारे 16 हजार 527 नागरिकांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. मागील आर्थिक वर्षात 8600 कामगारांचे विविध फॉर्म भरण्याबरोबर त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती काही मयत कामगारांचे विमा, अपघाती विमा, मुलींच्या लग्नाचा खर्च, दवाखाना खर्च अशा विविध प्रस्तावांमधून 8600 कामगारांच्या खात्यावर सुमारे दहा कोटी 16 लाख रुपये वर्ग करण्यात आले आहे.

लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी समाजातील उपेक्षित घटकाला न्याय देण्यासाठी ही योजना सर्वात प्रभावीपणे राबवली आहे किंबहुना राज्यांमध्ये सर्वाधिक या योजनेचा लाभ संगमनेर तालुक्यामध्ये मिळाला आहे. याचे सर्व श्रेय ही यशोधन कार्यालयाला आहे हे सर्वश्रुत आहे. आलेल्या प्रत्येक माणसाला विचारले तर तो सांगेल की आमचा फॉर्म भरणे कामी आणि मदत मिळून देणे कामी सर्व मदती यशोधन कार्यालयाने केली आहे.
गोरगरीब व असंघटित कामगारांना मिळालेल्या या निधीमुळे या सामान्य माणसांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाला असून या सर्व नागरिकांनी महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, इंद्रजीत भाऊ थोरात, डॉ.जयश्री थोरात यांचे प्रतिकृतज्ञता व्यक्त केली आहे.
मंजूर झालेला निधी हा यशोधन कार्यालयात भरलेल्या फॉर्म मुळे – संजय कोल्हे
संगमनेर तालुक्यामधून असंघटित व घरेलू कामगारांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याकरता यशोधन कार्यालयाने सातत्याने काम केले आहे. ज्यांना मदत मिळाली शासकीय योजनांचा लाभ मिळाला तो प्रत्येक माणूस सांगेल की ही सर्व मदत ही यशोधन कार्यालयाने केली आहे. ज्यांनी मदत केली नाही ज्यांनी फॉर्म भरलेला आहे ती मंडळी श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे. कामगारांना मिळणारी भांडी त्यांना मिळणाऱ्या सर्व सुविधा या यशोधन कार्यालयातून भरलेल्या फोर्मुळे फॉर्म मुळेच आहे किंबहुना आलेला निधी हा यशोधन मुळेच आला असून इतरांनी कोणीही श्रेय घेऊ नये असे आवाहन असंघटित कामगार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय कोल्हे यांनी केले आहे.



