गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांच्याकडून पाहणी

गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांच्याकडून पाहणी
रस्ते, पथदिवे आणि व्यवस्थेच्या कामांना वेग
Sangmner vijay kapse दि २५ ऑगस्ट २०२६ : गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमनेर शहरातील निश्चित करण्यात आलेल्या मिरवणूक मार्गाची नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून विविध सुविधांचा आढावा घेतला.

गणेशभक्तांना विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही त्रास होऊ नये, यासाठी रस्त्यांची दुरुस्ती, खड्डे बुजविणे, पथदिवे सुरू करणे तसेच मिरवणूक मार्ग सुव्यवस्थित करण्याच्या सूचना त्यांनी नगरपरिषद प्रशासनाला दिल्या.

यासोबतच ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील नियोजित ठिकाणांचीही पाहणी करण्यात आली. सणांच्या काळात अनावश्यक गर्दी होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी आवश्यक असलेला मार्ग खुला करण्यात आला असून, मार्गावरील खड्डे बुजविणे, पथदिवे सुरू करणे आणि रस्त्यांची आवश्यक डागडुजी करण्याची कामे वेगाने पूर्ण करण्यात येत आहेत. भाविकांना सुरक्षित व सुरळीतपणे मिरवणुकीत सहभागी होता यावे, यासाठी नगरपरिषद प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
गणेशोत्सव सुरक्षित, आनंददायी आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडावा, यासाठी नगरपरिषद प्रशासन पूर्णपणे सज्ज असून, नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांनी केले.



