आपला जिल्हा

अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या संबोधी आहेरचे राष्ट्रीय स्तरावर दैदिप्यमान यश

अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या संबोधी आहेरचे राष्ट्रीय स्तरावर दैदिप्यमान यश

अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या संबोधी आहेरचे राष्ट्रीय स्तरावर दैदिप्यमान यश

जाहिरात

Sangmner vijay kapse दि २५ ऑगस्ट २०२६: नांदेड येथे दि. १५ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या सप्तरंग कल्चरल फेस्टिव्हलच्या नॅशनल लेव्हल कॉम्पिटिशनमध्ये अमृतवाहिनी मॉडेल स्कूल व ज्युनिअर कॉलेज, अमृतनगर येथील विद्यार्थिनी कु. संबोधी आहेर हिने आपल्या बहुआयामी कलागुणांचे उत्कृष्ट सादरीकरण करत दोन पारितोषिके पटकावून राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले.

जाहिरात

कु. संबोधी आहेर हिने सेमी-क्लासिकल मॉडेल डान्स या प्रकारात आपल्या अप्रतिम नृत्याविष्काराने परीक्षकांची मने जिंकत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. तसेच सोलो सिंगिंग – लोकगीत या प्रकारातही आपल्या सुरेल आणि दमदार गायनाने परीक्षकांची दाद मिळवत तिने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले.

जाहिरात

नृत्य आणि गायन या दोन्ही कला प्रकारांत राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत संबोधीने अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. तिच्या या दुहेरी यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे माजी महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात, संस्थेचे विश्वस्त आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, व्यवस्थापकीय विश्वस्त शरयू देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी  अनिल शिंदे, व्यवस्थापक-प्राचार्य व्ही. बी. धुमाळ, डायरेक्टर अकॅडेमिक्स डॉ. जे. बी. गुरव तसेच प्राचार्य आशिष कुमार यांनी कु. संबोधी आहेर हिचे अभिनंदन करून तिच्या पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे