सहकारी बँकेतील १० वर्षे जुन्या संचालकांना राज्य सरकारकडून तूर्त दिलासा- चेअरमन सत्येन मुंदडा
सहकारी बँकेतील १० वर्षे जुन्या संचालकांना राज्य सरकारकडून तूर्त दिलासा- चेअरमन सत्येन मुंदडा
सहकारी बँकेतील १० वर्षे जुन्या संचालकांना राज्य सरकारकडून तूर्त दिलासा- चेअरमन सत्येन मुंदडा
अहिल्यानगर विजय कापसे दि २६ ऑगस्ट २०२६ : बँकिंग रेग्युलेशन कायद्यानुसार १० वर्षे जुन्या सहकारी बँकांमधील संचालकांना पुन्हा संचालक होण्यास प्रतिबंध करण्यात आल्याने सहकारी बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. या निर्णयाला विविध स्तरांतून तीव्र विरोध करण्यात आला होता. या निर्णयामुळे सहकारी बँकांच्या भवितव्याबाबतही चिंता व्यक्त होत होती.

या निर्णयाविरोधात फेडरेशनने न्यायालयात धाव घेतली होती. संचालकांच्या मुदतीसंदर्भातील निर्णय घेण्याचा अधिकार राज्याच्या सहकार विभागाला असून, केंद्र सरकारने असा निर्णय घेणे हे लोकशाही व घटनात्मक तत्त्वांच्या विरोधात असल्याचे संचालकांच्या वतीने मांडण्यात आले होते.

दरम्यान, अनेक ठिकाणी १० वर्षांपेक्षा अधिक काळ संचालक राहिलेल्या व्यक्तींना अपात्र घोषित करून त्यांचे निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र, राज्य सरकारने नुकताच ठराव करून राज्य निवडणूक प्राधिकरण व सहकार विभागाला १० वर्षे जुन्या संचालकांना अपात्र ठरवू नये, असे निर्देश दिले आहेत.

त्यामुळे तूर्तास अशा जुन्या संचालकांना सहकारी संस्थांच्या निवडणुका लढविण्याची मुभा मिळाली असून, राज्य सरकारच्या या निर्णयामुळे संचालक तसेच सहकारी बँकिंग क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
“राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सहकारी बँकांमधील अनुभवी संचालकांना मोठा दिलासा मिळाला असून, तूर्तास त्यांना निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे,” असे मत अहिल्यानगर जिल्हा बँक असोसिएशनचे चेअरमन सत्येन मुंदडा यांनी व्यक्त केले.




