आपला जिल्हा

कार्यकारणी बरखास्त असताना राजीनाम्यांची नौटंकी कशासाठी?

 कार्यकारणी बरखास्त असताना राजीनाम्यांची नौटंकी कशासाठी?

पक्षाच्या नावाचा व पदाचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई करणार; नितीनराव औताडे व कमलाकर कोते यांचा इशारा

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि २६ ऑगस्ट २०२६ : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेची संघटनात्मक वाटचाल जोमाने सुरू आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात बूथ लेव्हलवर बीएलओच्या माध्यमातून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचे काम सुरू असून, नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये कोपरगाव, शिर्डी, राहाता, श्रीरामपूर, देवळाली, नेवासा, शेवगाव आदी ठिकाणी शिवसेनेला चांगले यश मिळाले आहे. काही ठिकाणी अपेक्षित यश मिळाले नसले तरी संघटनात्मक बांधणी मोठ्या प्रमाणात झाल्याचा दावा तत्कालीन शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे व कमलाकर कोते यांनी केला.

जाहिरात

दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यात पक्ष संघटना बळकट करण्याचे काम सुरू असतानाच काही व्यक्तींकडून शिवसेनेच्या पूर्वीच्या पदांचा उल्लेख करून राजीनामे दिल्याच्या बातम्या सोशल मीडिया तसेच प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित केल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकारामुळे पक्षाची बदनामी होत असून, अशा बातम्यांना कोणताही अधिकृत आधार नसल्याचे औताडे व कोते यांनी स्पष्ट केले.

जाहिरात

अहिल्यानगर जिल्ह्याची कार्यकारणी सुमारे तीन महिन्यांपूर्वी काही कारणास्तव संपर्कप्रमुख तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बरखास्त केली आहे. त्यामुळे सध्या अहिल्यानगर उत्तर विभागात पूर्वीची कोणतीही अधिकृत कार्यकारणी अस्तित्वात नाही. नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी अद्याप झालेल्या नसताना कार्यकारणीच अस्तित्वात नसल्याने राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा दावा त्यांनी केला.

काही स्वयंघोषित पदाधिकारी पूर्वीच्या पदांचा उल्लेख करून प्रसारमाध्यमांना बातम्या देत असल्याने पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे. यापुढे कोणत्याही व्यक्तीने शिवसेनेच्या पदाचा अथवा पक्षाच्या नावाचा गैरवापर करून माध्यमांमध्ये बातम्या देऊ नयेत. अशा प्रकारची नौटंकी तातडीने थांबवावी, असा इशारा नितीनराव औताडे व कमलाकर कोते यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

जाहिरात

“कार्यकारणीच बरखास्त असताना राजीनाम्याचा प्रश्नच नाही. पक्षाच्या नावाचा गैरवापर करून संभ्रम निर्माण करणाऱ्यांनी यापुढे सावध राहावे. पक्षाच्या नावाचा अथवा पदाचा गैरवापर करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल,” असा इशाराही नितीनराव औताडे व कमलाकर कोते यांनी दिला.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे