सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेस आयएसओ मानांकन प्राप्त

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेस आयएसओ मानांकन प्राप्त

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लिमिटेड या बँकेला आयएसओ ९००१:२०१५ मानांकन प्राप्त झाल्या प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेने गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला असून, बँकेला आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयएसओ ९००१:२०१५ (ISO 9001:2015) हे मानांकन प्राप्त झाले आहे. हे मानांकन बँकेच्या ग्राहक सेवा, कार्यपद्धती आणि अंतर्गत नियंत्रण प्रणालीच्या उच्च दर्जाचे निदर्शक आहे.

आयएसओ ९००१:२०१५ हे आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली (Quality Management System) मानक आहे. हे मानांकन मिळाल्यामुळे हे अधोरेखित होते की संस्था, ग्राहकाभिमुख सेवा आणि सातत्यपूर्ण गुणवत्ता, कार्यपद्धतींचे प्रमाणीकरण व एकसूत्रीकरण (Standardization of Processes) अंतर्गत नियंत्रण व जोखीम व्यवस्थापनातील सुधारणा,सातत्यपूर्ण सुधारणा (Continual Improvement) साठी बांधिलकी, नियामक आणि भागधारकांचा वाढता विश्वास साध्य करताना दिसत आहे.

बँकेचे अध्यक्ष सुधाकर जोशी यांनी समाधान व्यक्त करताना सांगितले की, हे मानांकन बँकेच्या संचालक मंडळ, व्यवस्थापन आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे. गुणवत्तापूर्ण सेवा देण्याच्या दिशेने बँकेने उचललेले हे पाऊल ठेवीदार, सभासद आणि ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ करेल, तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) सुशासन (Governance) व अंतर्गत नियंत्रण मार्गदर्शक तत्त्वांशी सुसंगत कार्यपद्धती राबविण्यासाठी बँक कटिबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले.
हे मानांकन प्राप्त झाल्यानंतर बँक आपल्या कार्यपद्धती, ग्राहक सेवा आणि तक्रार निवारण यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर देणार आहे. सदर मानांकनाच्या अनुषंगाने वार्षिक अंतर्गत लेखापरीक्षण (Internal Audit) आणि पुनर्मूल्यांकन (Surveillance Audit) नियमितपणे केले जाईल, जेणेकरून गुणवत्तेचा हा दर्जा कायम राखता येईल.
सध्या बँकिंग व्यवस्था ही पूर्णपणे रिझर्व्ह बँकेच्या मापदंडाप्रमाणे कार्यरत आहेत आणि आपली बँक देखील याचे तंतोतंत पालन करत आहे. बँकेने व्यवसायामध्ये प्रगती साधताना गुणवत्ता देखील राखली असल्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. बँकेने कार्पोरेट ट्रेनिंग हॉल तयार करून आणि आपल्या कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या विषयांवर प्रशिक्षण देण्याचा चांगला उपक्रम हाती घेतला आहे. बँक विविध क्षेत्रांमध्ये करत असलेल्या सुधारणांबद्दल उपस्थितितांना अवगत केले. बँक डिजिटलायझेशन धोरण स्वीकारून, कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर विविध विभागांमध्ये करताना ग्राहकांना जागतिक दर्जाच्या सुविधा या ग्रामीण भागांमध्ये उपलब्ध करून देत आहे. याबद्दल अधिक माहिती देताना या सेवांमुळे बँकेची होत असलेली प्रगती बद्दल उपस्थितांना माहिती दिली.

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुजराथी यांनी नुकत्याच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तर्फे काढलेल्या परिपत्रकांचे बँक व्यवस्थापनाने अभ्यास करून त्याबाबतीत बँकेला धोरणांशी सुसंगत ठेवण्याचे काम केले असल्याचे सांगितले. नव्याने येणाऱ्या डीपीडीपी अॅक्ट 2023 या कायद्याबद्दल उपस्थितांना माहिती दिली.
याच कार्यक्रमांमध्ये बँकेला आयएसओ मानांकन मिळवून देताना गेले कित्येक महिने याचे नेतृत्व करणाऱ्या अमोल घुले आणि विवेक सोनवणे या कर्मचाऱ्यांचा सत्कार लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी बँकेचे सर्व संचालक मंडळ, अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी,तसेच बँकेचे ग्राहक आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
बँकेचे व्हाईस चेअरमन ॲड.नानासाहेब शिंदे यांनी बँक भविष्यामध्ये दोन नवीन शाखा धांदरफळ आणि इगतपुरी तालुक्यातील साकुर या ठिकाणी लवकरच उघडणार असल्याचे सांगितले. तसेच बँकेने अमृत उद्योग समूहातील कर्मचाऱ्यांसाठी वैशिष्ट्यपूर्ण अशी शैक्षणिक कर्ज सुविधा आणि रूप – टॉप सोलर योजना आणल्याचे सांगितले. त्यांनी याप्रसंगी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.




