आपला जिल्हा

जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी बाळासाहेब थोरात कायम कटिबद्ध

जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी बाळासाहेब थोरात कायम कटिबद्ध

नागरिकांची दररोज मोठी गर्दी; ‘एक तालुका, एक परिवार’ची संकल्पना संगमनेरमध्ये आजही कायम

Sangmner vijay kapse दि २६ ऑगस्ट २०२६ : कधीकाळी दुष्काळी म्हणून ओळखला जाणारा संगमनेर तालुका लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या सातत्यपूर्ण विकासकामांमुळे प्रगतशील तालुका म्हणून ओळखला जातो. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम कटिबद्ध असलेल्या थोरात यांच्या भेटीसाठी तालुक्यातील विविध गावांमधून नागरिकांची दररोज मोठी गर्दी होत आहे. ‘एक तालुका, एक परिवार’ ही संकल्पना आजही संगमनेरमध्ये जपली जात असून, नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी थोरात सातत्याने जनतेमध्ये उपलब्ध असतात.

जाहिरात

बाळासाहेब थोरात यांनी आपल्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनातील कार्यातून सर्वसामान्य जनतेच्या मनात विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे. संगमनेर तालुका हा आपला परिवार मानून त्यांनी गेल्या चार दशकांपासून जनतेसाठी अविरत काम केले आहे. सत्तेत असो अथवा नसो, सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी त्यांचा पाठपुरावा आणि प्रशासनाशी असलेला समन्वय कायम राहिला आहे. महसूल, कृषी, शिक्षण यांसारखी महत्त्वाची मंत्रिपदे भूषवतानाही त्यांनी जनतेशी असलेला संपर्क कायम ठेवला.

जाहिरात

शांत, संयमी आणि प्रत्येक व्यक्तीचे म्हणणे समजून घेणारे व्यक्तिमत्त्व म्हणून बाळासाहेब थोरात यांची ओळख आहे. त्यामुळे सामाजिक, वैयक्तिक तसेच विविध शासकीय कामांबाबत नागरिक मोठ्या विश्वासाने त्यांच्याकडे येतात. प्रत्येकाचा प्रश्न समजून घेणे, त्याबाबत योग्य मार्गदर्शन करणे आणि तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणे, ही त्यांची कार्यपद्धती असल्याचे नागरिक सांगतात.

जाहिरात

संगमनेर तालुक्यात सहकार, शिक्षण, ग्रामीण विकास, पायाभूत सुविधा तसेच विविध विकासकामांना त्यांनी मोठी चालना दिली. उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण ठरलेले निळवंडे धरण व दोन्ही कालव्यांचे काम मार्गी लावण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. संगमनेर शहर व तालुक्यात शांतता आणि सुव्यवस्था राखत विकासाचा वेग कायम ठेवण्यावरही त्यांनी भर दिला आहे.

यशोधन जनसंपर्क कार्यालय सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी कायम खुले असून, शासनाच्या विविध योजना, वैयक्तिक कामे आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी या माध्यमातून पाठपुरावा केला जातो. सुदर्शन निवासस्थान, यशोधन कार्यालय, कारखाना तसेच नवीन प्रशासकीय इमारत या ठिकाणीही बाळासाहेब थोरात नागरिकांच्या भेटीसाठी उपलब्ध असतात.

दररोज तालुक्यातील विविध कार्यक्रम, नवीन व्यवसायांची उद्घाटने, विकासकामे, सहकारी संस्थांचे कार्यक्रम तसेच राज्यातील विविध महत्त्वाच्या कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती असते. तालुका, जिल्हा आणि राज्यभरातून महिला, युवक व नागरिक आपले प्रश्न घेऊन त्यांच्याकडे येत असून, त्यांच्या पातळीवर नागरिकांना आवश्यक ते मार्गदर्शन व सहकार्य केले जात आहे.

चौकट

‘संगमनेरचा प्रामाणिकपणा’ ही ओळख थोरात यांच्यामुळे : इंजि. इंद्रभान चौधरी

“राज्यभरात कुठेही गेलो आणि ‘संगमनेरचे आहात’ असे सांगितले की विशेष सन्मान मिळतो. ‘तुम्ही थोरात साहेबांच्या तालुक्यातील’ म्हणून आपुलकीने मानसन्मान केला जातो. प्रामाणिक माणूस म्हणून संगमनेरची ओळख निर्माण झाली असून, ही ओळख लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या कामातून मिळाली आहे. त्यांच्या कार्यामुळे तालुक्यातील प्रत्येक नागरिकाला राज्यभरात सन्मान मिळत आहे,” असे इंजि. इंद्रभान चौधरी, कनोली यांनी सांगितले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे