आपला जिल्हा

राजेंद्र काळोखे यांच्या कुटुंबीयांची डॉ. विश्वासराव आरोटे यांच्याकडून सांत्वनपर भेट

राजेंद्र काळोखे यांच्या कुटुंबीयांची डॉ. विश्वासराव आरोटे यांच्याकडून सांत्वनपर भेट

राजेंद्र काळोखे यांच्या कुटुंबीयांची डॉ. विश्वासराव आरोटे यांच्याकडून सांत्वनपर भेट

Pimpri chinchwad vijay kapse दि २६ ऑगस्ट २०२६ श्रीक्षेत्र देहू गावचे सुपुत्र, दैनिक लोकमतचे पत्रकार तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईच्या पिंपरी चिंचवड शहर शाखेचे सदस्य राजेंद्र काळोखे यांचे काही दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.

जाहिरात

त्यांच्या निधनाने क्रीडा, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात आली. त्यांच्या कुटुंबीयांचे दुःख जाणून घेत दैनिक समर्थ गांवकरीचे संपादक तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी काळोखे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांना धीर देत दुःखात सहभागी असल्याचे सांगितले.

जाहिरात

यावेळी डॉ. आरोटे यांनी काळोखे कुटुंबीयांना आर्थिक स्वरूपात रोख मदत, दुखवटा तसेच किराणा साहित्य देऊन सामाजिक बांधिलकी जपली. राजेंद्र काळोखे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व काळोखे कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, अशी भावना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व दैनिक समर्थ गांवकरी समूहाच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

जाहिरात
स्व.राजेंद्र काळोखे

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे