आपला जिल्हा

संजीवनी इंटरनॅशनल स्कूलमध्ये विशेष व्याख्यान; क्षेत्र कोणतेही असो, उत्कृष्टतेचा ध्यास घ्या : अच्युत गोडबोले

संजीवनी इंटरनॅशनल स्कूलमध्ये विशेष व्याख्यान; क्षेत्र कोणतेही असो, उत्कृष्टतेचा ध्यास घ्या : अच्युत गोडबोले

संजीवनी इंटरनॅशनल स्कूलमध्ये विशेष व्याख्यान; क्षेत्र कोणतेही असो, उत्कृष्टतेचा ध्यास घ्या : अच्युत गोडबोले

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि २७ ऑगस्ट २०२६: बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी स्वतःला सतत अपडेट ठेवत आवडीच्या क्षेत्रात उत्कृष्टता साधावी. येत्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (एआय) प्रभाव केवळ तंत्रज्ञान क्षेत्रापुरता मर्यादित न राहता आरोग्य, शेती, शिक्षण, वाहतूक, कला अशा प्रत्येक क्षेत्रात वाढणार आहे. त्यामुळे एआयमुळे होणाऱ्या बदलांना घाबरून न जाता त्यांच्याशी जुळवून घ्या, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक व तंत्रज्ञान अभ्यासक अच्युत गोडबोले यांनी केले.

जाहिरात

शिर्डी येथील संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित विशेष व्याख्यानात ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हेड ऑफ अकॅडमिक गव्हर्नन्स डॉ. आर. एस. शेंडगे होते.

गोडबोले म्हणाले, एआयमुळे भविष्यात नोकऱ्यांचे स्वरूप बदलणार आहे. आरोग्य क्षेत्रात आजारांचे निदान करण्यासाठी, तर विविध क्षेत्रांत रोबोट व ड्रोनचा वापर वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी भविष्यातील बदलांचा स्वीकार करण्यासाठी सज्ज राहावे.

जाहिरात

एआयचा वापर करताना विद्यार्थ्यांनी सावधगिरी बाळगावी, असा सल्लाही त्यांनी दिला. चॅटजीपीटीसारख्या साधनांवर पूर्णपणे अवलंबून राहू नका. तार्किक विचार, सर्जनशीलता आणि निर्णयक्षमता स्वतः विकसित करा. एआयने दिलेली प्रत्येक माहिती अचूक असेलच असे नाही; त्यामुळे मिळालेली माहिती पडताळून पाहणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व संचालिका डॉ. मनाली कोल्हे यांनी उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी प्राचार्या शैला दुबे, संजीवनी अकॅडमीच्या प्राचार्या अनुश्रीता सिंग व डॉ. रितू वाजपेयी उपस्थित होत्या.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे