आपला जिल्हा

कोपरगावचे फुललेले राखी मार्केट,नियोजनबद्ध व्यवस्थेमुळे ग्राहकांची गर्दी : नारायणशेठ अग्रवाल 

कोपरगावचे फुललेले राखी मार्केट,नियोजनबद्ध व्यवस्थेमुळे ग्राहकांची गर्दी : नारायणशेठ अग्रवाल 
कोपरगावचे फुललेले राखी मार्केट,नियोजनबद्ध व्यवस्थेमुळे ग्राहकांची गर्दी : नारायणशेठ अग्रवाल 
Kopargaon vijay kapse दि २८ ऑगस्ट २०२६-  कोपरगाव शहरातील अहिंसा स्तंभाजवळ यंदा सजलेले राखी मार्केट ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे गर्दीने ओसंडून वाहत आहे. विशेष म्हणजे, कोणतीही मोठी जाहिरातबाजी, विशेष स्कीम, कुपन किंवा आकर्षक लाइटिंग नसतानाही या मार्केटला मिळालेला ग्राहकांचा प्रतिसाद कोपरगावच्या बाजारपेठेतील वाढता विश्वास अधोरेखित करणारा ठरला आहे.

जाहिरात
राखी खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने बाजारपेठेत दाखल होत असून, मार्केट परिसरात शिस्तबद्ध पद्धतीने दुकाने उभारण्यात आली आहेत. या संपूर्ण व्यवस्थेकडे आ.विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष पराग संधान यांनी स्वतः लक्ष दिल्याने व्यापारी तसेच ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. विशेषतः पार्किंगचे आणि वाहतुकीचे नियोजन यामुळे गर्दी असूनही वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला नाही.
दरवर्षी सणासुदीच्या काळात बाजारपेठेत गर्दी वाढत असते. मात्र यंदाच्या राखी मार्केटमध्ये नागरिकांना खरेदी करताना पुरेशी जागा, वाहनतळाची सुविधा आणि सुरळीत वाहतूक यांचा अनुभव मिळाला. त्यामुळे व्यापाऱ्यांसह ग्राहकांनीही समाधान व्यक्त केले.

जाहिरात
आज या मार्केटमध्ये उस्फुर्त झुंबड उडाली, हीच ग्राहकांच्या प्रतिसादाची खरी पावती आहे. कोणतीही मोठी स्कीम, कुपन किंवा विशेष लाइटिंग नसतानाही नागरिकांनी दिलेला प्रतिसाद बरंच काही सांगून जातो. नगराध्यक्ष पराग संधान यांनी स्वतः लक्ष घालून केलेले नियोजन आणि पार्किंगची व्यवस्था यामुळे यंदा वाहतूकही सुरळीत राहिली. नागरिकांना कोणतीही अडचण जाणवली नाही,असे मत ज्येष्ठ व्यापारी नारायणशेठ अग्रवाल यांनी व्यक्त केले.

जाहिरात
राखी मार्केटच्या या यशस्वी व्यवस्थेमुळे आगामी दिवाळी सणाच्या काळातही अशाच प्रकारचे नियोजन, पार्किंग व्यवस्था आणि वाहतूक नियंत्रण करण्यात यावे, अशी अपेक्षा नागरिक व व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे. सणासुदीच्या काळात बाजारपेठ अधिक आकर्षक, सुरक्षित आणि नागरिकांसाठी सुविधाजनक करण्याच्या दृष्टीने ही व्यवस्था आदर्श ठरू शकते.केवळ नकारात्मक विचार न करता अशा प्रकारे व्यवस्था सुधारणेचे जे कामे होत आहे त्याकडे डोळसपणे पाहून प्रशासनाचे देखील कौतुक करणे जागरूक नागरिकाचे कर्तव्य असते असे शेवटी अग्रवाल म्हणाले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे