आ. विवेक कोल्हे यांच्या कडे राजस्थान निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी

आ. विवेक कोल्हे यांच्या कडे राजस्थान निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी
आ. विवेक कोल्हे यांच्या कडे राजस्थान निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी

Kopargaon vijay kapse दि २८ ऑगस्ट २०२६: राजस्थानमधील आगामी नगर निकाय निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने निवडणूक तयारीला वेग दिला असून, महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाली येथील निवडणूक प्रभारी म्हणून महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार विवेक कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ही जबाबदारी मिळाल्यानंतर आ. कोल्हे यांनी पाली येथे पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसह निवडणूक तयारीला सुरुवात केली आहे. बूथ स्तरापर्यंत नियोजन करून आगामी नगर निकाय निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आ. कोल्हे यांच्यावर सोपविण्यात आलेली ही जबाबदारी महत्त्वाची मानली जात आहे.

आ. विवेकभैय्या कोल्हे यांनी निवडणूक निरीक्षक नरेंद्र पवार यांच्यासमवेत पाली येथील भाजप जिल्हा कार्यालयास भेट दिली. यावेळी पाली भाजप परिवाराच्या वतीने पारंपरिक साफा बांधून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. त्यानंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातून आलेले पदाधिकारी तसेच पाली भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक बैठक झाली.
बैठकीत आगामी नगर निकाय निवडणुकीत पालीमध्ये भाजपचा विजय निश्चित करण्यासह राजस्थानातील ‘ट्रिपल इंजिन’ सरकार अधिक मजबूत करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बूथ सशक्तीकरण, संघटनात्मक नियोजन, कार्यकर्त्यांची बांधणी आणि प्रभावी जनसंपर्क यावर विशेष भर देण्यात आला.

यावेळी आ. विवेकभैय्या कोल्हे म्हणाले, “आगामी नगर निकाय निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित करण्यासाठी संघटनेची ताकद अधिक मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली बूथ सशक्तीकरण, प्रभावी जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांच्या संघटनात्मक बांधणीचे काम सुरू आहे. पालीतील कार्यकर्त्यांचा उत्साह आणि ऊर्जा भाजपच्या विजयासाठी प्रेरणादायी असून, नगर निकाय निवडणुकीत भाजपचा निश्चितच विजय होईल.”
यावेळी पाली जिल्हा महामंत्री नारायण कुमावत, भाजप प्रवक्ते मंगलराम प्रजापत, प्रताप मंडल अध्यक्ष मानवेन्द्रसिंह भाटी, शिवाजी मंडल उपाध्यक्ष अभिषेक दुग्गड, प्रताप मंडल महामंत्री कैलाश गौड, प्रताप मंडल मंत्री अजय वैष्णव, जिल्हामंत्री प्रताप सिंह यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



