आपला जिल्हा

साईबाबा कॉर्नर ते कोल्हे कारखाना रस्त्याचा प्रश्न मार्गी, २० कोटींच्या निधीतून सिमेंट काँक्रेट रस्ता भूमिपूजन संपन्न

साईबाबा कॉर्नर ते कोल्हे कारखाना रस्त्याचा प्रश्न मार्गी, २० कोटींच्या निधीतून सिमेंट काँक्रेट रस्ता भूमिपूजन संपन्न
साईबाबा कॉर्नर ते कोल्हे कारखाना रस्त्याचा प्रश्न मार्गी, २० कोटींच्या निधीतून सिमेंट काँक्रेट रस्ता भूमिपूजन संपन्न
Kopargaon vijay kapse दि २९ ऑगस्ट २०२६-साईबाबा कॉर्नर ते कोपरगाव रेल्वे स्टेशन या अत्यंत महत्त्वपूर्ण रस्त्याचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता मार्गी लागला असून, केंद्रीय रस्ते निधी अंतर्गत प्राप्त झालेल्या २० कोटी रुपयांच्या निधीतून साईबाबा कॉर्नर ते कोल्हे कारखाना पर्यंत सिमेंट काँक्रेट रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन शनिवार, दि. २९ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

जाहिरात
यावेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार विवेकभैय्या कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजीवनी उद्योग समूहाचे मार्गदर्शक बिपीनदादा कोल्हे होते. यावेळी कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष पराग संधान, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चे. ज्ञानेश्वर परजणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहम, दिलीप दारुणकर, केशवराव भवर, विजयराव आढाव, मच्छिंद्र केकान, अतुलशेठ काले यासह मंचावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी,यांच्यासह विविध संस्थांचे आजी-माजी संचालक, सभापती, सरपंच, उपसरपंच तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात
खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी सांगितले की, मजबूत रस्ते ही परिसराच्या विकासाची महत्त्वाची पायाभूत सुविधा आहे. शेतकरी, विद्यार्थी, उद्योजक आणि नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीसाठी हा मार्ग अत्यंत उपयुक्त असून, रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.

जाहिरात
आमदार विवेकभैय्या कोल्हे म्हणाले की, हा रस्ता पूर्व भागातील अनेक गावांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. औद्योगिक वसाहतीतील २०० हून अधिक उद्योजक, संजीवनी युनिव्हर्सिटीतील २० ते २५ हजार विद्यार्थी, तसेच सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना, गोदावरी दूध संघ आणि रेल्वे स्थानकामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. त्यामुळे पुढील २० ते २५ वर्षे टिकेल अशा दर्जेदार सिमेंट काँक्रेट रस्त्याचे काम व्हावे, यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.

जाहिरात
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी साईबाबा कॉर्नर ते संजीवनी युनिव्हर्सिटीकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किमान १० फुटांचा फुटपाथ, रस्ता पूर्ण झाल्यानंतर स्ट्रीट लाईट, तसेच साईबाबा कॉर्नर येथे वाहतूक सुरळीत करण्यासाठी ट्रॅफिक सिग्नलची व्यवस्था करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना रबल स्ट्रिप्स आणि साई कॉर्नर येथे वाहतूक पोलिसांची नियमित उपस्थिती यामुळे नागरिक व विद्यार्थ्यांची सुरक्षितता यावर लक्ष देण्याची सूचना केली आहे.
बिपीनदादा कोल्हे यांनी हा रस्ता दररोज सुमारे ३० ते ४० हजार नागरिकांच्या वापरातील असल्याचे सांगून तो दीर्घकाळ टिकणाऱ्या दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. कामासाठी आवश्यक ते सहकार्य संजीवनी उद्योग समूह, औद्योगिक वसाहत आणि कोपरगाव नगरपालिका यांच्या माध्यमातून करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डीकडे होणारी भाविकांची वाढती वाहतूक आणि कोपरगाव रेल्वे स्थानकाच्या विकासकामांच्या पार्श्वभूमीवर या रस्त्याचे महत्त्व आणखी वाढणार आहे. २० कोटींच्या निधीतून होणारा हा आधुनिक सिमेंट काँक्रेट रस्ता कोपरगावच्या पूर्व भागाच्या विकासाला नवी गती देणारा ठरणार असून, विद्यार्थी, नागरिक, शेतकरी, उद्योग आणि कारखान्यांच्या वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे.आभार वैभव आढाव यांनी मानले.
श्री साईबाबा कॉर्नर ते सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना इथपर्यंत होणारे या चौपदरीकरण सिमेंट काँक्रेट रस्त्याला स्वर्गीय शंकरराव कोल्हे मार्ग असे नाव द्यावे अशी मागणी जेष्ठ व्यापारी नारायण अग्रवाल यांनी या कार्यक्रमादरम्यान केली.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे