आपला जिल्हा

मुस्लिम अनाथ शाळेच्या अभ्यासिकेसाठी आ. आशुतोष काळेंनी दिला ३० लाखांचा निधी- फकीर कुरेशी

मुस्लिम अनाथ शाळेच्या अभ्यासिकेसाठी आ. आशुतोष काळेंनी दिला ३० लाखांचा निधी- फकीर कुरेशी

मुस्लिम अनाथ शाळेच्या अभ्यासिकेसाठी आ. आशुतोष काळेंनी दिला ३० लाखांचा निधी- फकीर कुरेशी

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि ४ सप्टेंबर २०२६- कोपरगाव शहरातील मदरसा मिफ्ताहुल उलूम येथील अनाथ आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांची अभ्यासिका व वाचनालयाची समस्या कायमची दूर करण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी उपलब्ध करून दिलेल्या ३० लाख रुपयांच्या निधीतून अद्ययावत वाचनालय आणि अभ्यासिकेचे बांधकाम लवकरच सुरु होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक फकीर कुरेशी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत जागेची पाहणी केली.

जाहिरात

या निधीमुळे अनाथ व गरीब विद्यार्थ्यांना हक्काची आणि शांत अभ्यासाची जागा उपलब्ध होणार असल्याने शाळेच्या शिक्षकांनी समाधान व्यक्त केले. आ. आशुतोष काळे यांच्या या सहकार्याबद्दल मदरसा प्रशासनाने व स्थानिक नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत. यावेळी माजी नगरसेवक फकीर कुरेशी म्हणाले की, या आश्रमशाळेत गरीब, गरजू आणि अनाथ विद्यार्थी निवासी शिक्षण घेतात. मात्र या शाळेला सुसज्ज वाचनालय आणि अभ्यासासाठी स्वतंत्र अभ्यासिका नसल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक तयारी करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. हीच अडचण ओळखून आ. आशुतोष काळे यांनी महायुती शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून या कामासाठी ३० लाख रुपयांचा निधी आणला आहे.

जाहिरात

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य उज्वल करण्यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याच्या आ. आशुतोष काळे यांचा सातत्याने प्रयत्न असतो. यापूर्वीही मदरसा, कब्रस्तान, संरक्षण भिंत, कब्रस्तान सुशोभीकरण आणि नवीन कब्रस्तान यांसह मुस्लिम समाजाच्या विविध मूलभूत प्रश्नांकडेही गांभीर्याने लक्ष देऊन निधी उपलब्ध करून दिला आहे. याच बरोबर सर्वधर्म समभाव जपतांना सर्व समाजाला सोबत घेवून कोपरगावातील सर्वच जाती धर्माचे सार्वजनिक सभामंडप, मंदिरे बांधण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी भरीव निधी दिला आहे. या बद्दल मुस्लिम समाजाच्या वतीने त्यांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले. यावेळी मुस्लिम समाजबांधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे