सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कामगार पतपेढीला ३९.५१ लाखांचा नफा

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कामगार पतपेढीला ३९.५१ लाखांचा नफा
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कामगार पतपेढीला ३९.५१ लाखांचा नफा

Kopargaon vijay kapse दि ४ सप्टेंबर २०२६— संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कामगार पतपेढीला सन २०२५-२६ मध्ये ३९ लाख ५१ हजार रुपयांचा नफा झाल्याची माहिती पतपेढीचे अध्यक्ष सुरेश कोंडीराम मगर यांनी दिली.
शिंगणापूर येथील कारखाना कार्यस्थळावरील संजीवनी उद्योग भवन येथे पतपेढीची ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. यावेळी ते बोलत होते. प्रारंभी संस्थेचे आधारस्तंभ माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

मगर म्हणाले की, आमदार विवेकभैय्या कोल्हे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे भागभांडवल ८१ लाख ९ हजार रुपये, गुंतवणूक ९ कोटी ७५ लाख रुपये, तर मार्चअखेर संस्थेकडे ५ कोटी ८७ लाख रुपयांचे फंड जमा आहेत. संस्थेच्या ठेवी १४ कोटी ३३ लाख रुपये असून १० कोटी ४८ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे.

सभासदांच्या पाल्यांसाठी संस्थेने विद्यार्थी गुणवत्ता निधी स्थापन केला आहे. या निधीतून इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत विशेष गुणवत्ता मिळविणाऱ्या २६ सभासदांच्या पाल्यांचा रोख बक्षिसे व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. व्यवस्थापक राजेंद्र सोनवणे यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचले. सभासदांनी इतिवृत्तासह विषयपत्रिकेवरील विषय क्रमांक २ ते १३ एकमताने मंजूर केले.

यावेळी प्रभारी कार्यकारी संचालक तुळशीराम कानवडे, साखर महाव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, कामगार नेते मनोहर शिंदे, व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे, जनसंपर्क अधिकारी रंगनाथ लोंढे यांच्यासह संचालक, अधिकारी, आजी-माजी पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. सूत्रसंचालन संचालक विलास कहांडळ यांनी केले, तर उपाध्यक्ष आण्णासाहेब पगारे यांनी आभार मानले.




