आपला जिल्हा

विद्यार्थ्यांच्या विचार संशोधनात संजीवनीचे मोलाचे योगदान-बिपीनदादा कोल्हे

विद्यार्थ्यांच्या विचार संशोधनात संजीवनीचे मोलाचे योगदान-बिपीनदादा कोल्हे
विद्यार्थ्यांच्या विचार संशोधनात संजीवनीचे मोलाचे योगदान-बिपीनदादा कोल्हे
जाहिरात

Kopargaon vijay kapse दि ४ सप्टेंबर २०२६-ग्रामिण भागात राहुन अभियांत्रीकी तांत्रिक शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांचे संशोधन पेपर जागतिक स्तरावरील परिषदांमधुन प्रसिध्द व्हावे ही विचारधारा माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांची होती आणि त्यादृष्टीने संजीवनी विद्यापीठात शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांनी जाणिवपुर्वक प्रयत्न करून ते प्रत्यक्षात अंमलात आणले अशा विद्यार्थ्यांच्या विचार संशोधनात संजीवनीचे मोलाचे योगदान असल्याचे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले.

जाहिरात
         तालुक्यातील टाकळी येथील कुमारी धनश्री सुनिल देवकर व संवत्सर येथील कुमारी स्वस्तीका कुलदीप जगताप या विद्यार्थीनीं आर्टिफिशिअल इंटेलिजीअन्स (कृत्रीम बुध्दीमत्ता) अभ्यासक्रमाचे शिक्षण संजीवनी युनिव्हर्सिटी मध्ये घेत असुन त्यांनी संशोधीत केलेले पेपर ऑक्सफर्ड विद्यापीठ (अमेरिका) युनायटेड किंगडम येथे होणा-या जागतिक ए-आय परिषदेत वाचले जाणार असुन त्याबददल कुमारी धनश्री सुनिल देवकर हिचा संजीवनी उद्योग समुह सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्यावतीने नुकताच सत्कार करण्यांत आला त्याप्रसंगी ते बोलत होते.

जाहिरात
          श्री. बिपीनदादा कोल्हे पुढे म्हणाले की, या विद्यार्थीनींनी संजीवनी विद्यापाठाचे रूरल टु ग्लोबल हे घोषवाक्य ख-या अर्थाने सार्थ ठरविले आहे. ग्रामिण भागातील शेतक-यांची तसेच अन्य मुले-मुली अभियांत्रीकी, तांत्रिक, वैद्यकिय, व्यवस्थापन, औषधनिर्माण, सैनिकी आदि अभ्यासक्रमाचे दर्जेदार शिक्षण मिळावे हे स्वप्न माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी ४४ वर्षापुर्वी पाहिले होते. त्यादृष्टीने त्यांनी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टीट्युटच्या माध्यमांतुन तयारी करत त्यासाठीच्या सर्व पायाभुत सुविधा एकाच छताखाली आणून के. जी. पासुन पी. जी. पर्यंतचे शैक्षणिक धडे येथे गिरवले आणि नामांकित विषयासह उच्चशिक्षीत मनुष्यबळ येथे उपलब्ध केले.

जाहिरात

त्यामुळेच कुमारी धनश्री देवकर, कुमारी स्वस्तीका जगताप या सर्वात कमी वयाच्या विद्यार्थीनींना ऑक्सफर्ड विद्यापीठात जगभरातुन सोळा उमेदवारांत संशोधन पेपर सादर करण्याची संधी मिळाली त्याचे त्यांनी सोने करावे व स्वतः सह परिसराचे ज्ञान वृध्दींगत करून अन्य विद्यार्थ्यांनीही नांवलौकीकास्पद कामगिरी करावी असेही ते शेवटी म्हणांले. कुमारी धनश्री ही सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष अंबादास देवकर यांची नात व माजी सभापती सुनील देवकर यांची कन्या आहे. कुमारी देवकर व जगताप यांच्या या निवडीबददल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे