एस जे एस मध्ये आयुर्मेध २०२६ कार्यशाळेचा उत्साहात समारोप

एस जे एस मध्ये आयुर्मेध २०२६ कार्यशाळेचा उत्साहात समारोप
एस जे एस मध्ये आयुर्मेध २०२६ कार्यशाळेचा उत्साहात समारोप

Kopargaon vijay kapse दि ५ सप्टेंबर २०२६ : राष्ट्रसंत जनार्दन स्वामी कॉलेज ऑफ फार्मसी आणि आरजेएस आयुर्वेद मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर, कोकमठाण यांच्या संयुक्त विद्यमाने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘आयुर्मेध २०२६’ या तीन दिवसीय प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यशाळेचा उत्साहात समारोप झाला.
‘जेथे परंपरा आणि विज्ञान यांचा संगम होतो’ या संकल्पनेवर आधारित कार्यशाळेत फार्मसी व आयुर्वेद शाखेतील विद्यार्थ्यांना एकत्रित प्रात्यक्षिक शिक्षण देण्यात आले. औषधी निर्मिती प्रक्रिया, कच्च्या मालाची ओळख, उपकरणांचे हाताळणी व कार्यपद्धती तसेच विविध विश्लेषणात्मक तंत्रांचा प्रत्यक्ष वापर याबाबत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

या उपक्रमातून पारंपरिक आयुर्वेदिक ज्ञान आणि आधुनिक फार्मास्युटिकल विज्ञानाचा समन्वय साधत विद्यार्थ्यांना अनुभवाधारित शिक्षण मिळाले. तसेच ज्ञानाची देवाणघेवाण, आंतरशाखीय संवाद आणि संशोधनाभिमुख दृष्टिकोन विकसित होण्यास मदत झाली.
कार्यशाळेचे उद्घाटन आरजेएस समूह संस्थेच्या सल्लागार परिषदेचे सदस्य विजय कडू व दीपक कोटमे, आरजेएस फाउंडेशनचे संचालक प्रणित काटकडे, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. नितीन जैन, आरजेएस आयुर्वेद मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. नारायण पाटील आणि उपप्राचार्या डॉ. उषा जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, व्यावसायिक कौशल्ये, औद्योगिक ज्ञान, संशोधनवृत्ती आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करण्यासाठी आरजेएस समूह संस्थेकडून अशा कौशल्याधारित उपक्रमांना सातत्याने प्राधान्य दिले जाते.
या अभिनव उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष चांगदेव कातकडे, सचिव प्रसादजी कातकडे, प्राचार्य व उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. सुनील घोंगडे, डॉ. अदिती शिंदे, डॉ. योगिनी भोयर, डॉ. वैभव बिलारी, डॉ. पूनम काळे, डॉ. प्राजक्ता आव्हाड, डॉ. वर्षा रोकडे, प्रा. कांचन गुर्सळ, प्रा. मेघना रायजादे, प्रा. अक्षदा वाघचौरे, प्रा. वैभव गाढवे, प्रा. सोनाली कोते, प्रा. पूजा जाधव, प्रा. विशाखा रणशूर व प्रा. साक्षी काले यांनी विशेष परिश्रम घेतले. दोन्ही महाविद्यालयांच्या विद्यार्थी परिषद सदस्यांनीही सक्रिय सहभाग नोंदविला.





