आपला जिल्हा

संगमनेर नगरपरिषदेच्या विविध विकासकामांचे उद्या लोकार्पण व भूमिपूजन

संगमनेर नगरपरिषदेच्या विविध विकासकामांचे उद्या लोकार्पण व भूमिपूजन

संगमनेर नगरपरिषदेच्या विविध विकासकामांचे उद्या लोकार्पण व भूमिपूजन

Sangmner vijay कापसे दि. ६ सप्टेंबर २०२६ : संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने शहरातील विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन समारंभ सोमवार, दि. ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता नगरपरिषद प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास लोकनेते बाळासाहेब थोरात व  सुवर्णा मालपाणी यांचे शुभहस्ते प्रमुख उपस्थितीत विकासकामांचा शुभारंभ होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. डॉ. सुधीर तांबे राहणार आहेत.
कार्यक्रमास आमदार सत्यजित तांबे, महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य, मा. दुर्गा तांबे, प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा तसेच मा. डॉ. जयश्री थोरात, अध्यक्ष, एकविरा फाउंडेशन यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याशिवाय माजी नगराध्यक्ष दिलीपराव पुंड, विश्वासराव मुर्तडक, कैलासराव लोणारी व अरुणराव वाकचौरे उपस्थित राहणार आहेत. नगरपरिषदेच्या वतीने उपनगराध्यक्ष नुरोमहंमद शेख, नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे, मुख्याधिकारी दयानंद गोरे, तसेच विविध समित्यांचे सभापती व उपसभापती यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

नगरपरिषद प्रशासनाच्या माध्यमातून शहराच्या विकासाला गती देण्यासाठी विविध विकासकामे हाती घेण्यात आली असून, त्यापैकी पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण तसेच प्रस्तावित कामांचे भूमिपूजन या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. कार्यक्रमास सर्व नगरसेवक-नगरसेविका, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे