आपला जिल्हा

ज्ञानदान करणाऱ्या गुरुजनांचा सन्मान; शिक्षक दिन उत्साहात साजरा

ज्ञानदान करणाऱ्या गुरुजनांचा सन्मान; शिक्षक दिन उत्साहात साजरा

ज्ञानदान करणाऱ्या गुरुजनांचा सन्मान; शिक्षक दिन उत्साहात साजरा

Kopargaon vijay kapse दि ७ सप्टेंबर २०२६: रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स व संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथे भारताचे माजी राष्ट्रपती व महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

जाहिरात

या निमित्ताने कला, वाणिज्य व विज्ञान विभागातील इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिका साकारत अध्यापनाचे कार्य केले. विद्यार्थ्यांनी मनोगतातून शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करून त्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

जाहिरात

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे होते. अध्यक्षीय मनोगतात ते म्हणाले, “विद्यार्थी म्हणून शिकणे सोपे आहे; परंतु शिक्षक बनून इतरांना शिकवणे कठीण असते. शिक्षक हा देशाची भावी पिढी कर्तव्यदक्ष, सक्षम व संस्कारक्षम करण्याचे उदात्त कार्य मोठ्या तळमळीने करतो.” विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाचे केलेले नियोजन कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी सांगितले.

जाहिरात

यावेळी वरिष्ठ वाणिज्य विभागप्रमुख डॉ. अर्जुन भागवत, कला विभागप्रमुख डॉ. बंडेराव तऱ्हाळ, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य रवींद्र हिंगे, पर्यवेक्षक माधव रेवगडे, कलावती देशमुख, शांतीलाल अग्रवाल, अण्णासाहेब गोराणे, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. सुनीता आत्रे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

येवले भूमिका, सोनार साई, पाटील समृद्धी, जामदार तृप्ती, होले निकिता, रोहम श्लोक, प्रियदर्शनी पिंपळे आदी विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिका साकारत सक्रिय सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अक्षदा गायकवाड हिने केले. सूत्रसंचालन अपूर्वा चव्हाण व विद्या सावंत यांनी केले, तर आभार शाक्यवंशिका वाघ हिने मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे