आपला जिल्हा

कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी लवकरच जाहीर होणार

कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी लवकरच जाहीर होणार

युवक, महिला, विद्यार्थी, ओबीसी, अल्पसंख्याकांसह विविध सेलच्या संघटनात्मक बांधणीला मिळणार बळ

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि ७ सप्टेंबर २०२६ :- कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत करण्यासाठी कोपरगाव शहरात विविध विभागांच्या कार्यकारिण्या गठित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. समाजातील विविध घटकांना पक्षाच्या माध्यमातून जनसेवेशी जोडून घेताना युवक, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना संघटनेत सक्रिय भूमिका देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध विभाग व सेलच्या कार्यकारिण्या लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, राष्ट्रवादी महिला काँग्रेस, राष्ट्रवादी युवती काँग्रेस, ओबीसी विभाग,अल्पसंख्याक विभाग, सामाजिक न्याय विभाग, सोशल मीडिया विभाग, ज्येष्ठ नागरिक विभाग, डॉक्टर सेल,वकील सेल, सेवा दल तसेच सांस्कृतिक व क्रीडा आदी विभागाचा समावेश असणार आहे.

जाहिरात

आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव शहरासह मतदारसंघातील विविध विकासकामांना गती मिळाली असून शासनाच्या लोककल्याणकारी योजना आणि विकासकामांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पक्ष संघटनेच्या माध्यमातून भविष्यात व्यापक जनसंपर्क अभियान राबविण्यावर भर दिला जाणार आहे. विशेषतः युवक-युवतींना संघटनेत मोठी संधी, महिलांचा वाढता सहभाग, सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रभावी जनसंवाद तसेच डॉक्टर, वकील, ज्येष्ठ नागरिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींना संघटनेशी जोडण्याचा प्रयत्न या आगामी कार्यकारीणीच्या माध्यमातुन केला जाणार आहे.

जाहिरात

शहरातील विविध समाजघटक, युवक, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या कार्यकर्ते व नागरीकांना पक्षाच्या संघटनात्मक कार्याशी जोडून घेण्याच्या दृष्टीने या कार्यकारिण्यांना विशेष महत्त्व आहे. प्रत्येक घटकाचा पक्षाच्या माध्यमातून जनसेवेत सक्रिय सहभाग वाढविणे, नागरिकांशी थेट संवाद साधणे आणि त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रभावीपणे पाठपुरावा करणे, हा या संघटनात्मक विस्तारामागील प्रमुख उद्देश आहे.या विविध विभागांच्या कार्यकारिण्या जाहीर झाल्यानंतर कोपरगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद आणखी वाढण्याबरोबरच ‘संघटन मजबूत, जनसंपर्क व्यापक आणि जनसेवा प्रभावी’ या उद्देशाने पक्षाच्या कामाला अधिक गती मिळणार आहे. आमदार आशुतोष काळे यांच्या  मार्गदर्शनाखाली लवकरच या सर्व विभागांच्या कार्यकारिण्यांची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे