मनोज हासे यांना ‘महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार’

मनोज हासे यांना ‘महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार’
मनोज हासे यांना ‘महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार’

Sangmner vijay kapse दि ८ सप्टेंबर २०२६: जय हिंद युवा मंचचे धडाडीचे कार्यकर्ते तथा एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टच्या हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी मनोज हासे यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक व सेवाभावी कार्याबद्दल ‘महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार २०२६’ देऊन गौरविण्यात आले.
राजापूर येथील रहिवासी असलेले मनोज हासे हे लोकनेते बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जय हिंद युवा मंचच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय झाले. आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी सातत्याने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत.

सध्या एसएमबीटी सेवाभावी हॉस्पिटलमध्ये जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत असताना गरजू रुग्णांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. रुग्णांचे ‘हक्काचे मित्र’ म्हणून कार्य करणाऱ्या हासे यांच्या सेवाभावी कार्याची दखल घेत शिर्डी येथील विविध चेंज फाउंडेशनच्या वतीने त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिर्डी येथे झालेल्या शानदार कार्यक्रमात मनोज हासे यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी तरुण कार्यकर्ते तेजस हासे उपस्थित होते.

मनोज हासे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, दुर्गा तांबे, डॉ. जयश्री थोरात, डॉ. हर्षल तांबे, डॉ. मैथिली तांबे, संतोष हासे यांच्यासह विविध कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.




