आपला जिल्हा

गुरुवारी राजहंस दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा

गुरुवारी राजहंस दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा

सकाळी 9 वाजता शेतकी संघ तर 11 वाजता दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा

जाहिरात

Sangmner vijay kapse दि १६ सप्टेंबर २०२६– दूध व्यवसायातून ग्रामीण आर्थिक समृद्धी निर्माण करणाऱ्या संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता कारखाना कार्यस्थळावरील अमृतेश्वर मंदिरासमोरील प्रांगणात काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात व मा.आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत व राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले असल्याची माहिती व्हाईट चेअरमन राजेंद्र चकोर यांनी दिली आहे.

जाहिरात

वार्षिक सर्वसाधारण सभे बाबत माहिती देताना ते म्हणाले की, काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राजहंस दूध संघाने संगमनेर तालुक्याची ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत केली आहे. दूध संघामुळे अनेक गरीब कुटुंबांना मदत मिळाली आहे. या दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 वा. अमृतेश्वर मंदिरासमोरील प्रांगणात आयोजित करण्यात आली आहे.

जाहिरात

यावेळी मा.महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, डॉ.जयश्रीताई थोरात, ॲड.माधवराव कानवडे, बाबा ओहोळ, सौ.दुर्गाताई तांबे,डॉ.मैथिलीताई तांबे, पांडुरंग पाटील घुले, सुधाकर जोशी, संपतराव डोंगरे, शंकरराव खेमनर,रामहरी कातोरे, हौशीराम सोनवणे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे, के.के.थोरात, इंद्रजीत भाऊ थोरात यांच्यासह विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तर सकाळी 9 वाजता शेतकी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संघाचे चेअरमन संपतराव डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा बँक हॉल मार्केट यार्ड शाखा येथे होणार आहे.

तरी या वार्षिक सर्वसाधारण सभासाठी सर्व उत्पादक शेतकरी सभासद बंधू-भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राजहंस दूध संघाचे सर्व संचालक तसेच शेतकी संघाचे सर्व संचालक व कार्यकारी संचालक डॉ.सुजित खिलारी व मॅनेजर अनिल थोरात यांनी केले आहे.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे