संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने कोपरगावात ‘वाजवेल तो गाजवेल’ ढोल-ताशा स्पर्धा
संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने कोपरगावात ‘वाजवेल तो गाजवेल’ ढोल-ताशा स्पर्धा
ढोल-ताशा पथकांनी १९ सप्टेंबरपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन; २१ सप्टेंबरला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर स्पर्धा
Kopargaon vijay kapse दि १६ सप्टेंबर २०२६–संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने गणेशोत्सवा निमित्त ‘वाजवेल तो गाजवेल’ ढोल -ताशा स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान, कोपरगाव येथे सायंकाळी ४.३० ते रात्री १० वाजेपर्यंत ही स्पर्धा होणार आहे.

संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आमदार विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील तीन वर्षांपासून कोपरगाव शहरात या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. यंदा स्पर्धेचे चौथ्या वर्षात दिमाखदार पदार्पण होत असून, शहरातील विविध ढोल-ताशा पथकांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा वादनाच्या परंपरेला प्रोत्साहन देण्याबरोबरच शहरातील युवकांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.मागील तीन वर्षांपासून या उपक्रमाला शहरातील युवक आणि ढोल-ताशाप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कोपरगाव शहरातील ढोल-ताशा पथकांनी दि. १९ सप्टेंबर २०२६ पर्यंत अधिकृत नोंदणीसाठी ८३२९२१४७१९/८१८१९०९०९० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

स्पर्धेतील विजेत्या पथकांना आकर्षक पारितोषिके तसेच सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. शहरातील सर्व ढोल-ताशाप्रेमींनी दि. २१ सप्टेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर उपस्थित राहून स्पर्धेला प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.



