आपला जिल्हा

खेमनर वस्ती व सय्यद वस्ती रस्त्याचा प्रश्न  आ. आशुतोष काळेंनी मार्गी लावला- सिकंदर इनामदार

खेमनर वस्ती व सय्यद वस्ती रस्त्याचा प्रश्न  आ. आशुतोष काळेंनी मार्गी लावला- सिकंदर इनामदार

खेमनर वस्ती व सय्यद वस्ती रस्त्याचा प्रश्न  आ. आशुतोष काळेंनी मार्गी लावला- सिकंदर इनामदार

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि १८ सप्टेंबर २०२६–सोयेगाव बंधाऱ्यातून पोहेगावच्या दिशेने वाहणाऱ्या ओढ्यामुळे खेमनर वस्ती व सय्यद वस्ती येथील नागरिकांना दळणवळणाच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. ओढ्याला पाणी आल्यावर नागरिकांना पाण्यातूनच ये-जा करावी लागत असल्याने विद्यार्थी, शेतकरी तसेच ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत होती. खेमनर वस्ती व सय्यद वस्तीच्या नागरिकांना येणाऱ्या अडचणीची दखल घेऊन आमदार आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे अधिकारी अमित चोळके यांना ओढ्यात सिमेंट पाईप टाकून रस्ता तयार करून देण्याच्या सुचना दिल्या असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते सिकंदर इनामदार यांनी दिली आहे.

जाहिरात

सोयेगाव बंधाऱ्यातून पोहेगावकडे येणाऱ्या ओढ्याला पाणी आल्यावर येथील नागरिक, शेतकरी आणि शालेय विद्यार्थ्यांना पाण्यातूनच ये-जा करावी लागत होती. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांचे मोठे हाल होत होते. शेतकऱ्यांना शेतमालाची ने-आण करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता. या गंभीर समस्येची दाखल घेऊन आ. आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या अधिकाऱ्यांना या ओढ्यावर दोन सिमेंट पाईप टाकून आवश्यक ते सीडी वर्क व रस्त्याचे काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आ. आशुतोष काळेंच्या सूचनेनंतर अधिकाऱ्यांनी तातडीने प्रत्यक्ष जागेची पाहणी करून प्रत्यक्ष कामाला त्वरित सुरुवात करण्याचे आश्वासन दिले आहे.

जाहिरात

खेमनर वस्ती व सय्यद वस्तीचा कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला रस्त्याचा प्रश्न सुटणार असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसर असून नागरिकांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे