विरोधकांकडे सध्या ‘मुद्द्यांचाच दुष्काळ’; टंचाई परिस्थितीवरून राजकारण करू नका: जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील
विरोधकांकडे सध्या ‘मुद्द्यांचाच दुष्काळ’; टंचाई परिस्थितीवरून राजकारण करू नका: जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील
विरोधकांकडे सध्या ‘मुद्द्यांचाच दुष्काळ’; टंचाई परिस्थितीवरून राजकारण करू नका: जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील
Loni vijay kapse दि २० सप्टेंबर २०२६–राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत सरकार अतिशय संवेदनशील असून, सर्व जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेण्याचे काम सुरू झाले आहे. सर्व परिस्थिती समोर आल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारच्या एकत्रित मदतीचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. मात्र, विरोधकांनी राजकारण करण्यासाठी दुष्काळाचे माध्यम शोधणे हे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

मंत्री विखे पाटील म्हणाले की, ५ ऑक्टोबरपर्यंत राज्यातील सर्व परिस्थितीचा अंदाज समोर येईल. सर्व मंत्री जिल्ह्यांमध्ये दौरे करून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. त्यामुळे केवळ दुष्काळाच्या मुद्द्याचे राजकारण करणे योग्य नाही. विरोधकांकडे सध्या मुद्द्यांचाच दुष्काळ झाला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची आवश्यकता आहे. महायुती सरकार अतिशय संवेदनशीलतेने या सर्व परिस्थितीला सामोरे जात असून, शेतकऱ्यांना मदत होईल असे निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्यांना मदत करण्याबाबतची कार्यपद्धती ठरलेली आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना याची पूर्णतः माहिती आहे, कारण मंत्री म्हणूनही त्यांनी प्रदीर्घ काम केले आहे. त्यांनी व्यक्त केलेल्या भावना चुकीच्या नाहीत. ठरलेल्या कार्यपद्धतीप्रमाणेच सरकारला निर्णय करावे लागतात. त्यानुसार एनडीआरएफ आणि राज्य सरकार एकत्रित मिळून मदतीसाठी निश्चित पुढाकार घेईल, असे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

राज्यातील गळीत हंगामापुढे यावर्षी आव्हानात्मक परिस्थिती असून, यंदा उसाचे क्षेत्र घटले आहे. लागवड झाली आहे की नाही, अशी शंका असून कारखान्यांच्या हंगामाचा कालावधीही आता ८० दिवसांवर आला आहे. अशा संकटातही गळीत हंगाम पूर्ण करावा लागणार असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.



