आपला जिल्हा

मुख्यमंत्री सहायता निधी व हिंदुवाडा तरुण मंडळाच्या समन्वयाने कोठारी हॉस्पिटलकडून आरोग्य शिबिर

मुख्यमंत्री सहायता निधी व हिंदुवाडा तरुण मंडळाच्या समन्वयाने कोठारी हॉस्पिटलकडून आरोग्य शिबिर

मुख्यमंत्री सहायता निधी व हिंदुवाडा तरुण मंडळाच्या समन्वयाने कोठारी हॉस्पिटलकडून आरोग्य शिबिर

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि २० सप्टेंबर २०२६ : गणेशोत्सवाच्या मंगलमय पर्वात सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहायता निधी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हिंदुवाडा तरुण मंडळ आणि कोठारी हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड इंटेन्सिव्ह केअर युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या उपक्रमांतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

जाहिरात

शिबिरामध्ये कोठारी हॉस्पिटलचे एम.डी. डॉ. योगेश कोठारी (MBBS, D.Ortho), डॉ. वैभव गिरी (MS Ortho), डॉ. गणेश थोमरे (MD Medicine), डॉ. शालका उबाळे तसेच हॉस्पिटल मॅनेजर पंकज जगताप, राहुल मैंद यांनी उपस्थित नागरिकांना विविध आरोग्यविषयक समस्या, आजारांचे निदान, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.

जाहिरात

यावेळी डॉ. योगेश कोठारी यांनी मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मिळणाऱ्या वैद्यकीय मदतीची सविस्तर माहिती दिली. योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया तसेच वेळेवर निदान व उपचाराचे महत्त्व याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून अपघातासह विविध गंभीर आजारांवरील उपचारासाठी मदत मिळू शकते, अशी माहिती देण्यात आली. अपघातग्रस्त रुग्णांसाठी पोलिस एफआयआर तसेच पोलिस स्टेशन डायरी आवश्यक असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

हिंदुवाडा तरुण मंडळाचे अध्यक्ष तथा नगरसेवक बाळासाहेब रुईकर पाटील यांचे या आरोग्य शिबिरासाठी विशेष सहकार्य लाभले. तसेच नगरसेवक राजेंद्रजी वाकचौरे पाटील, सदस्य दादा हलवाई, प्रसाद रुईकर, आबिद रंगरेज, प्रतीक कानडे, गणेश पुरोहित, आकाश हलवाई आणि मयूर शिरसार यांनी उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले.

‘गणरायाच्या आगमनासोबत प्रत्येक कुटुंबाच्या आरोग्याचा श्रीगणेशा व्हावा’ या सामाजिक भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून आरोग्यविषयक जनजागृती करण्यात आली. गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक उत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड देत नागरिकांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणारा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे