आपला जिल्हा

संकटांवर मात करून प्रवरा कारखाना यंदा १२ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करणार: ना. राधाकृष्ण विखे पाटील

संकटांवर मात करून प्रवरा कारखाना यंदा १२ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करणार: ना. राधाकृष्ण विखे पाटील

संकटांवर मात करून प्रवरा कारखाना यंदा १२ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करणार: ना. राधाकृष्ण विखे पाटील

Loni vijay kapse दि २० सप्टेंबर २०२६-“दुष्काळी परिस्थिती, घटलेले ऊस उत्पादन आणि पाणीटंचाई अशा प्रतिकूल परिस्थितीत यंदाचा गळीत हंगाम साखर उद्योगासाठी आव्हानात्मक असला, तरी संकटांवर मात करण्याची प्रवरेची ऐतिहासिक परंपरा आहे. सर्वांनी एकत्रित प्रयत्न करून यंदाचा गळीत हंगाम यशस्वी करण्याचा संकल्प करूया; कारखाना १२ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट निश्चितपणे पूर्ण करेल,” असा विश्वास जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

जाहिरात

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात ते बोलत होते. ज्येष्ठ मार्गदर्शक तथा माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याचा बॉयलर अग्नीप्रदीपन सोहळा संपन्न झाला. या वेळी ना. राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा  शालिनी विखे पाटील यांच्यासह कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील, व्हा. चेअरमन सोपानराव शिरसाठ, प्रवरा बँकेचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे, कैलास तांबे, उपसभापती अण्णासाहेब कडू, ट्रक वाहतूक संस्थेचे उपाध्यक्ष सुनील जाधव, चेअरमन मकरंद गुणे, व्हा. चेअरमन विजय लगड, शांतीनाथ आहेर आणि कार्यकारी संचालक महेश कोनापुरे यांच्यासह सर्व संचालक, सभासद, कामगार व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी संचालक रंगनाथ भाऊराव उंबरकर, रामप्रसाद मगर, श्रीकांत खर्डे, दिलीप यादव यांच्या हस्ते सपनिक बॉयलरचे विधिवत पूजन करण्यात आले. या समारंभाच्या निमित्ताने औपचारिकरीत्या उसाच्या मोळीचे पूजनही करण्यात आले.

जाहिरात

या वेळी बोलताना ना. विखे पाटील म्हणाले की, राज्य सरकारने सहकारी साखर कारखाने लवकर सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा थेट फायदा होणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या साखर धोरणामुळे सहकारी साखर कारखानदारीला मोठा आर्थिक आधार मिळाला आहे. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीचा ऊस उत्पादनावर मोठा परिणाम होणार असून, अनेक भागांत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे धरणांमध्ये उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याचे चोख नियोजन करावे लागणार आहे. पिण्याच्या पाण्याला आमचे सर्वोच्च प्राधान्य असून, शेतीच्या पाण्यासाठीही योग्य नियोजन करून ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी कसे राखून ठेवता येईल, असा जलसंपदा विभागाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

जाहिरात

शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करावे आणि उसाचे एकरी उत्पादन कसे वाढविता येईल यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन करून मंत्री विखे पाटील म्हणाले की, यंदाच्या गाळप हंगामापुढे नैसर्गिक परिस्थितीचे मोठे आव्हान आहे. मात्र, यावर मात करून प्रवरा कारखान्याने यंदा १२ लाख मेट्रिक टन गाळपाचे जे उद्दिष्ट ठेवले आहे, ते सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून निश्चितपणे पूर्ण होईल.

माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी कारखाना वेळेत सुरू करण्यासाठी व्यवस्थापनाने केलेल्या नियोजनाचे कौतुक केले. पूर्ण क्षमतेने कारखाना चालविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे सांगतानाच दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता पुढील वर्षी ऊस लागवडीसाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहित करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी यंदा कारखाना वेळेत गळीत हंगामासाठी सज्ज केल्याबद्दल कामगारांच्या परिश्रमांचे कौतुक केले. अहिल्यानगर जिल्ह्यात उच्चांकी गाळप आणि उच्चांकी साखर उतारा देणारा कारखाना म्हणून प्रवरा कारखान्याची अग्रगण्य कामगिरी राहावी, यासाठीचे सूक्ष्म नियोजन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रसंगी ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, अधिकारी आणि प्रवरा उद्योग समूहातील सर्व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे