आपला जिल्हा

कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त कोपरगाव शहरात भव्य रॅली

कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त कोपरगाव 

शहरात भव्य रॅली

कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त कोपरगाव शहरत भव्य रॅली

Kopargaon vijay kapse दि २२ सप्टेंबर २०२६ : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव संकुलात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जुने सायन्स कॉलेज येथून महाविद्यालयापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली.

जाहिरात

       या रॅलीमध्ये कोपरगाव संकुलातील सर्व शाळा व महाविद्यालयांतील प्राध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन अॅड. संदीप वर्पे,  रमेश बोळीज, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य  पद्मकांत कुदळे यांच्यासह संस्थेचे विविध पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकवृंद रॅलीत उपस्थित होते.

जाहिरात

      कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा जागर करत उत्साहपूर्ण वातावरणात रॅली महाविद्यालयाच्या परिसरात पोहोचली. त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

    ‘कमवा आणि शिका’ या अभिनव संकल्पनेच्या माध्यमातून सर्वसामान्य व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणाऱ्या कर्मवीरांच्या शैक्षणिक कार्याचे यावेळी स्मरण करण्यात आले. शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडविण्याचा त्यांचा विचार आजही विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे उपस्थितांनी नमूद केले. रॅलीच्या समारोपप्रसंगी उपस्थितांना संबोधित करतानायावेळी डॉ. संतोष पवार यांनी कर्मवीर अण्णांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यावर प्रकाश टाकत मार्गदर्शन केले. आपल्या मनोगतात, “सर्वसामान्य जनतेसाठी शिक्षणाची दारे खुली व्हावीत आणि बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, या उदात्त हेतूने कर्मवीर अण्णांनी रयत शिक्षण संस्थेची उभारणी केली. मिसेस फेरार, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी शैक्षणिक सुधारणांसोबतच सामाजिक सुधारणांचीही मुहूर्तमेढ रोवली. हाच सुधारणावादी आणि पुरोगामी विचारांचा वारसा राजर्षी शाहू महाराजांपासून कर्मवीर अण्णांपर्यंत समर्थपणे पुढे नेण्यात आला.” असे व्यक्त केले.

जाहिरात

       अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. माधव सरोदे म्हणाले, “कर्मवीर अण्णांचा शिक्षणविचार समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, त्यांच्या कार्याची प्रेरणा नव्या पिढीने घ्यावी, या उद्देशाने कोपरगाव शहरातून रॅली काढण्यात आली. अण्णांनी समाजाला श्रमप्रतिष्ठेचा संदेश दिला आणि ‘कमवा व शिका’ योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वावलंबनाची दिशा दिली. शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकी, समानता आणि समाजाच्या सर्वांगीण विकासाचा विचार त्यांनी रुजविला. त्यांच्या या विचारांचा वारसा जपत समाजाच्या विकासासाठी योगदान देणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. बंडेराव तऱ्हाळ यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक  शिवाजी लंके, कर्मवीर भाऊराव पाटील तांत्रिक व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक  गजानन जाधव, सी.एम. मेहता कन्या विद्यामंदिर च्या मुख्याध्यापिका अनिता धनक, पद्मा मेहता कन्या विद्यामंदिरच्या प्रभारी मुख्याध्यापिका संगीता दरेकर, महाविद्यालयातील जूनियर विभागाचे प्रभारी उपप्राचार्य  रवींद्र हिंगे, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. घनश्याम भगत, वाणिज्य व व्यवस्थापन शाखेचे उपप्राचार्य डॉ. अर्जुन भागवत, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे डॉ.निलेश मालपुरे, कार्यालय अधीक्षक  सुनील गोसावी,कनिष्ठ वरिष्ठ विभागातील सर्व विद्यार्थी, स्वयंसेवक,शिक्षक प्राध्यापक व  प्राध्यापकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे