गुणवंत विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने सन्मान
जाहिरात
Kopargaon vijay kapse दि २३ सप्टेंबर २०२६– आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३९ वी जयंती मंगळवार, दि. २२ सप्टेंबर रोजी राज्यभरातील रयत शिक्षण संस्थेच्या शाळा-महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. त्याच अनुषंगाने करंजी येथील कर्मवीर शंकरराव काळे माध्यमिक विद्यालयातही कर्मवीर जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली.
जाहिरात
कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य कारभारी आगवन यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला.
जाहिरात
यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची माहिती उपस्थितांना करून दिली. विद्यार्थ्यांच्या या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या तसेच शिष्यवृत्ती परीक्षा आणि विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या कर्मवीर शंकरराव काळे माध्यमिक विद्यालय तसेच करंजी जिल्हा परिषद शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, कोपरगाव यांच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास सांडूभाई पठाण, डॉ. सुनील देसाई, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे कोपरगाव तालुका अध्यक्ष तथा विद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष विजय कापसे, पोलीस पाटील अनिल चरमळ, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख संजय महानुभव, कर्मवीर शंकरराव काळे विद्यालयाचे मुख्याध्यापक दिनकर माळी, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप भाकरे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश कापसे, ह.भ.प. योगेश महाराज, एकनाथ फापाळे, एकनाथ कापसे, अनिल शिंदे, पंकज रासकर, पवन कापसे, बळीराम भिंगारे, प्रकाश पानपाटील, बाबासाहेब आगवन यांच्यासह ग्रामस्थ, पालक, शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संदीप चव्हाण, राधाकिसन टाकसाळ, वीणा चौधरी, सचिन डांगे, धनलाल ठाकरे, सुनील पिंपळे, प्रशांत गायकवाड, सिद्धार्थ बरडे, बाळू मोरे, गवनाथ डोखे आदींनी परिश्रम घेतले.