आर्यवीर तायक्वांदो अकॅडमीची शालेय तायक्वांदो स्पर्धेत उत्तुंग भरारी

आर्यवीर तायक्वांदो अकॅडमीची शालेय तायक्वांदो स्पर्धेत उत्तुंग भरारी
३९ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
Kopargaon vijay kapse दि २३ सप्टेंबर २०२६: तालुका क्रीडा समिती, कोपरगाव व कोपरगाव तालुका तायक्वांदो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय शासकीय तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धा नुकत्याच तालुका क्रीडा संकुल, कोपरगाव येथे उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत आर्यवीर तायक्वांदो अकॅडमीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत आपले वर्चस्व सिद्ध केले.

या स्पर्धेत कोपरगाव तालुक्यातील संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, के. जे. सोमय्या कॉलेज, शारदा इंग्लिश मीडियम स्कूल, डॉ. सी. एम. मेहता कन्या विद्या मंदिर, छत्रपती शिवाजी विद्यालय कोळपेवाडी, राधाबाई काळे कन्या विद्यालय कोळपेवाडी, श्रीमान गोकुळचंद विद्यालय, भागचंद माणिकचंद ठोळे इंग्लिश मीडियम स्कूल, के. बी. पी. स्कूल, रेनबो इंटरनॅशनल स्कूल, आत्मा मालिक गुरुकुल, आत्मा मालिक इंग्लिश मीडियम स्कूल, महर्षी विद्यालय, समता स्कूल, संजीवनी अकॅडमी आदी विविध शाळांमधील सुमारे १२० मुला-मुलींनी सहभाग नोंदविला.

आर्यवीर तायक्वांदो अकॅडमीच्या तब्बल ३९ विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. त्यामुळे आर्यवीर अकॅडमीचा संघ तालुक्यातील सर्वाधिक यशस्वी संघ ठरला. या सर्व ३९ खेळाडूंची श्रीगोंदा येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यशस्वी खेळाडूंना कोपरगाव तालुका तायक्वांदो संघटनेचे प्रमुख प्रा. सुदर्शन पांढरे सर, ॲड. स्नेहल पांढरे मॅडम, तसेच वर्षा देठे मॅडम, सरस ठोळे सर, हर्ष लंगोटे सर, यश सांगळे सर आणि सप्तमी डहाळे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.

आर्यवीर तायक्वांदो अकॅडमीच्या सर्व यशस्वी खेळाडूंचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.



