आपला जिल्हा

अमृतवाहिनी सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी

अमृतवाहिनी सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी

सात स्पर्धांमध्ये ७ ट्रॉफींसह ४१ हजार ५०० रुपयांच्या रोख पारितोषिकांची कमाई

Sangmner vijay kapse दि २३ सप्टेंबर २०२६ : अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, संगमनेरच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांनी पुणे येथील अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील विविध तांत्रिक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले. इंजिनिअर्स डे व नॅशनल काँक्रीट डे २०२६ निमित्त आयोजित या स्पर्धांमध्ये अमृतवाहिनीच्या विद्यार्थ्यांनी प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांक पटकावत एकूण ७ ट्रॉफींसह ४१ हजार ५०० रुपयांची रोख पारितोषिके मिळविली.

जाहिरात

याबाबत माहिती देताना प्राचार्य डॉ. पी. आर. बाविस्कर यांनी सांगितले की, लोकनेते बाळासाहेब थोरात व सौ. शरयू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीवर सातत्याने भर दिला आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या तांत्रिक ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर करता यावा, यासाठी विविध उपक्रम व स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. त्याचाच परिणाम म्हणून पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.

जाहिरात

ग्रीन काँक्रीट मिक्स डिझाईन स्पर्धेत दर्शन मालटकर, मयुरेश नारोटे, जय कडाळे, रितेश राठोड व तन्मय आव्हाळे यांच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवत ट्रॉफी व १० हजार रुपयांचे रोख पारितोषिक पटकावले.

काँक्रीट क्यूब टेस्टिंग स्पर्धेत सूरज झोडगे, तुषार पवार, साहिल उगलमुगले, सिद्धांत शिंदे व संकेत वाबळे यांच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळवत ट्रॉफी व ७ हजार ५०० रुपयांचे पारितोषिक मिळविले.

जाहिरात

सर्व्हेइंग लाइन-आऊट स्पर्धेत दिग्विजय रोहमारे, गौरव साबळे, श्रावणी शिंदे, रिद्धी कोकणे, पूजा शिंदे व राहुल क्षीरसागर यांच्या संघाने तृतीय क्रमांक मिळवत ट्रॉफी व ५ हजार ५०० रुपयांचे पारितोषिक पटकावले.

टेक्निकल क्विझ स्पर्धेत अथर्व भावसार, विशाखा गांगुर्डे, अनिकेत गीते व वैष्णवी अंकामवार यांच्या संघाने तृतीय क्रमांक मिळविला. तसेच क्यूब टेस्टिंग स्पर्धेत मयुरेश नारोटे, अजय वाळुंजे, दर्शन मालटकर व जय कडाळे यांच्या संघानेही तृतीय क्रमांक मिळविला. दोन्ही संघांना ट्रॉफी व प्रत्येकी ५ हजार ५०० रुपयांचे पारितोषिक मिळाले.

आईस्क्रीम स्टिक ब्रिज स्पर्धेत भक्ती जाधव, संस्कृती गोडसे, ईश्वरी डुकरे, सानिका गाडेकर व आर्यन देशमुख यांच्या संघाने तृतीय क्रमांक मिळवत ट्रॉफी व ५ हजार ५०० रुपयांचे रोख पारितोषिक मिळविले.

ऑटोकॅड स्पर्धेत दातीर समृद्धी हिने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवत ट्रॉफी व २ हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले.

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व माजी शिक्षणमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, विश्वस्त डॉ. सुधीर तांबे, व्यवस्थापकीय विश्वस्त शरयू देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, मॅनेजर व्ही. बी. धुमाळ, प्राचार्य डॉ. पी. आर. बाविस्कर, रजिस्ट्रार प्रा. व्ही. पी. वाघे, सिव्हिल इंजिनिअरिंग विभागप्रमुख डॉ. एस. बी. कांडेकर व समन्वयक प्रा. सी. एस. कडलग यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे