डी.बी.टी. स्टार कॉलेज समन्वयकांची ७ वी आढावा बैठक सोमैया महाविद्यालयात संपन्न

डी.बी.टी. स्टार कॉलेज समन्वयकांची ७ वी आढावा बैठक सोमैया महाविद्यालयात संपन्न
डी.बी.टी. स्टार कॉलेज समन्वयकांची ७ वी आढावा बैठक सोमैया महाविद्यालयात संपन्न

Kopargaon vijay kapse दि २३ सप्टेंबर २०२६-केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या डी.बी.टी. स्टार कॉलेज प्रोग्राम अंतर्गत अनुदान प्राप्त महाविद्यालये व टास्क फोर्सची ७ वी तीन दिवसीय आढावा बैठक यशस्वीरित्या संपन्न झाली असल्याची माहिती स्थानिक के. जे. सोमैया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी येथे दिली.

प्राचार्य डॉ. ठाणगे पुढे म्हणाले की, “या आढावा बैठकीच्या उद्घाटन सत्रात प्राचार्य डॉ. सुरेश गर्ग यांचे मार्गदर्शन, विशेष व्याख्यान सत्र, पोस्टर प्रेसेंटेशन, टास्क फोर्स मीटिंग आदी सत्र संपन्न झाले. त्याचबरोबर या आढावा बैठकीचे औचित्य साधून महाविद्यालयात नव्याने उभ्या उभारण्यात आलेल्या ए. आय. एम. एल. व डेटा सायन्स विषयांच्या सुसज्य प्रयोगशाळेचे उद्घाटन शिक्षक आमदार मा. सत्यजित तांबे, प्राचार्य डॉ. सुरेश गर्ग यांच्या शुभहस्ते व को. ता. एज्यु. सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. दुसऱ्या दिवशी सायंकाळी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या कलावंत विद्यार्थ्यांनीमहाराष्ट्राची लोककलाया विषयावरील नृत्य गीते सादर करून उपस्थित टास्क फोर्स कमिटी, वैज्ञानिक, संशोधक व प्राध्यापकांची मने जिंकली. या तीन दिवसीय आढावा बैठकीचे विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या स्टार कॉलेज प्रोग्राम विभागाच्या (दिल्ली) नियंत्रणाखाली दूरदृश्य प्रणाली द्वारे संचालन करण्यात आले.”

प्रोफेसर नवीनचंद्र बिष्ट यांनीमस्टर्ड फंक्शनल फूड फॉर बेटर न्यूट्रिशनया विषयावर बोलताना मोहरीचे तेल पोषण्यासाठी कसे उपयुक्त आहे, हे समजावून सांगितले. तर प्रोफेसर सुरजीत सरकार यांनी फाइंडिंग बिग इनसाईट थ्रू सिम्पल एक्सपरिमेंट्सया विषयांवर बोलताना पदवीस्तरावरील विद्यार्थ्यांनी प्रयोगशाळेत छोटे-छोटे प्रयोग कसे करावेत, विद्यार्थ्यांचा बेसिक सायन्स कडे तसेच संशोधनाकडे कल वाढण्यासाठी काय प्रयत्न करावेत या संदर्भात अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. तसेच विशाखापट्टणम विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रोफेसर दयानंद सिद्धावत्तम यांनी महाविद्यालयातील व उपस्थित संशोधक, प्राध्यापकांना आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानाद्वारे मार्गदर्शन केले.
दरम्यान डी.बी.टी. स्टार कॉलेज योजनेतील अनुदान प्राप्त महाविद्यालयांच्या समन्वयकांचे पोस्टर प्रेझेंटेशन (प्रत्यक्ष व ऑनलाईन) संपन्न झाले. या पोस्टर्सचे मूल्यमापन संबंधित मंत्रालयाच्या टास्क फोर्स सदस्यांनी हायब्रीड प्रणाली द्वारे केले. यापुढील आढावा बैठकीत संबंधित पोस्टर सादरीकरण करणाऱ्या महाविद्यालयांच्या अनुदानावर निर्णय घेतला जाईल असेही सांगण्यात आले.केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या डी.बी.टी. स्टार कॉलेज प्रोग्राम अंतर्गत अनुदान प्राप्त महाविद्यालये व टास्क फोर्सच्या ७ व्या तीन दिवसीय आढावा बैठकीच्या औपचारिक समारोप सत्रात बोलताना प्राचार्य डॉ. सुरेश गर्ग यांनी आढावा बैठकीच्या एकूण नियोजना संदर्भात, पोस्टर प्रेसेंटेशन त्याचबरोबर सोमैया महाविद्यालयातील नूतन व इतर सुसज्ज प्रयोगशाळा पाहून आनंद झाल्याचे सांगितले. या तीन दिवसीय बैठकीसाठी संस्थेचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे, सचिव मा. ऍड. संजीव कुलकर्णी, कार्यकारी विश्वस्त मा. संदीप रोहमारे यांची प्रमुख उपस्थिती मार्गदर्शन लाभले. दुसऱ्या व तिसऱ्या दिवसाच्या विशेष व्याख्यानसत्रांची विस्तृत भूमिका तसेच वक्त्यांचा परिचय महाविद्यालयाचे स्टार कॉलेज प्रोग्राम समन्वयक डॉ. शंकरय्या कोंडा यांनी करून दिला. डॉ. शैलेंद्र बनसोडे व प्रा. वर्षा आहेर यांनी सर्व सत्रांचे सूत्रसंचालन केले.

या आढावा बैठकीसाठी दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, काश्मीर, नागालँड, गोवा, आंध्र प्रदेश, पंजाब, शिलॉंग, गुजरात, तामिळनाडू, आसाम, केरळ व महाराष्ट्रातील डीबीटी स्टार कॉलेज टास्क फोर्स समन्वयक, संशोधक व प्राचार्य आवर्जून उपस्थित होते. त्याचबरोबर सोमैया महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या पदव्युत्तर वर्गांचे विद्यार्थी संशोधक आणि बहुसंख्य प्राध्यापक देखील उपस्थित होते. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉ. गणेश शिंदे, रजिस्ट्रार डॉ. अभिजीत नाईकवाडे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बाळासाहेब सोनवणे, डॉ.जिभाऊ मोरे, डॉ.बापूसाहेब भोसले, डॉ. संतोष पगारे, डॉ. संजय अरगडे, डॉ.रवींद्र जाधव, प्रा. संदीप जगझाप यांनी आढावा बैठकीच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.




