बहादराबाद येथे महिला समूहांच्या व्यवसायांचा शुभारंभ उमेद अभियानातून महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना

बहादराबाद येथे महिला समूहांच्या व्यवसायांचा शुभारंभ
उमेद अभियानातून महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना
बहादराबाद येथे महिला समूहांच्या व्यवसायांचा शुभारंभ
उमेद अभियानातून महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना

Kopargaon vijay kapse दि २४ सप्टेंबर २०२६: उमेद अभियानांतर्गत बहादराबाद येथे महिला बचत गटांच्या विविध व्यवसायांचा शुभारंभ करण्यात आला. ग्रामीण महिलांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने कावेरी महिला समूह व खुशी समूहाने नवीन व्यवसाय सुरू केले आहेत.

कावेरी महिला समूहाने शेळी पालन हा व्यवसाय सुरू केला असून, त्यासाठी आयएफसी अंतर्गत ३ लाख ५० हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच खुशी समूहाने कीड गोट नर्सरी हा व्यवसाय सुरू केला असून, या व्यवसायासाठी १ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

या दोन्ही व्यवसायांचा शुभारंभ कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी स्वप्नील वाळुंज यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उमेद अभियानातील अधिकारी व कर्मचारी तसेच संबंधित महिला समूहांच्या सदस्या तर गावचे सरपंच उपसरपंच ग्रामस्थ, ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी गटविकास अधिकारी वाळुंज यांनी बोलताना सांगितले की, या व्यवसायांच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना रोजगार व उत्पन्नाचे शाश्वत साधन उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. तसेच महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला, उद्योजकतेला आणि व्यवसायिक कौशल्याला चालना मिळणार आहे उमेद अभियानाच्या माध्यमातून महिला बचत गटांनी विविध व्यवसाय उभारून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी सुरू केलेला हा उपक्रम ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे सांगितले.




