आपला जिल्हा

गणेश विसर्जनासाठी एकविरा फाउंडेशनचे ४०० स्वयंसेवक मदत करणार

गणेश विसर्जनासाठी एकविरा फाउंडेशनचे ४०० स्वयंसेवक मदत करणार

पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करा – डॉ.जयश्रीताई थोरात

Sangmner vijay kapse दि २४ सप्टेंबर २०२६- संगमनेर शहर व तालुक्यात गणेश उत्सव मोठ्या आनंदाने साजरा झाला असून अनंत चतुर्थीच्या दिवशी लोकनेते मा.आ.बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वात दरवर्षीप्रमाणे एकविरा फाउंडेशन चे 400 युवक व युवती नागरिकांना गणेश विसर्जन करण्यासाठी मदत कार्यात सहभागी होणार आहेत. सर्व नागरिकांनी पर्यावरण पूरक गणेश विसर्जन करा असे आवाहन डॉ.जयश्रीताई थोरात यांनी केले आहे.

जाहिरात

एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा फाउंडेशनच्या वतीने मागील सहा वर्षापासून अनंत चतुर्थीच्या दिवशी तालुक्यातील शेकडो युवक व युवती दिवसभर विसर्जन कामात नागरिकांना मदत करतात. याचबरोबर निर्मल्याचे संकलन करून परिसर स्वच्छ करतात. हा अभिनव उपक्रम संगमनेर करांसाठी आनंददायी असून यावर्षी सुद्धा एकविरा फाउंडेशनचे चारशे युवक व युवती निर्माल्य संकलन व गणेश विसर्जन कामात मदत करणार असल्याचे डॉ.जयश्री थोरात यांनी सांगितले आहे.

जाहिरात

संगमनेर शहरात विविध गणेश मंडळांनी आदर्श देखाव्यांसह विद्युत रोषणाई केली आहे. हे देखावे पाहण्यासाठी नागरिकांची शहरांमध्ये मोठी गर्दी होत आहे. मोठ्या आनंदाने गणेशोत्सव साजरा होत असून या काळात असणाऱ्या निर्माल्याची विल्हेवाट लावण्यासाठी एकविरा फाउंडेशनच्या वतीने तयारी करण्यात आली आहे. त्याचबरोबर जाणता राजा मैदान येथे कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. पर्यावरण पूरक व स्वच्छतेचा मंत्र देऊन काम करणाऱ्या एकवीरा फाउंडेशन ने नदीकाठी नागरिकांसाठी गणेश विसर्जनाची व्यवस्था केली आहे. संगमनेर नगरपालिका व विविध स्वयंसेवी मंडळ ही यामध्ये सहभागी होणार आहेत.

नदीला पाणी असल्याने नागरिकांनी गणेश विसर्जनासाठी जास्त खोल पाण्यामध्ये जाऊ नये पर्यावरण पूरक स्वच्छ आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करावा असे आव्हान डॉ.जयश्रीताई थोरात यांनी केले असून गणेश विसर्जनासाठी आल्यानंतर सर्वांनी निर्मलाचे संकलन एकत्र करावे असे आवाहनही केले आहे.

जाहिरात

या दिवशी सुरक्षा पथकांसह, पोहणारे तरुण सज्ज असणार आहेत याचबरोबर नागरिकांना आनंदाने गणेशोत्सव मिरवणूक साजरी होईल यासाठी एकविरा फाउंडेशन चे सर्व स्वयंसेवक मदत करणार आहेत.

तरी नागरिकांनी जाणता राजा मैदान येथील कृत्रिम तलाव व नदीकाठी गणेश विसर्जन करताना खोल पाण्यामध्ये न जाता काळजीपूर्वक गणेश विसर्जन करावे असे आवाहनही एकविरा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

जयश्री थोरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे