आपला जिल्हा
अमृतवाहिनी एमबीए च्या ७ विद्यार्थ्यांची वार्षिक ६.१२ लाख पॅकेजवर निवड

अमृतवाहिनी एमबीए च्या ७ विद्यार्थ्यांची वार्षिक ६.१२ लाख पॅकेजवर निवड

Sangmner vijay kapse दि २३ सप्टेंबर २०२६–महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात गुणवतापूर्ण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत असलेल्या अमृतवाहिनी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅड बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (AIMBA), संगमनेर येथील एमबीएच्या ७ विद्यार्थ्यांची हाउसी कीमॅन्शन्स प्रायव्हेट लिमिटेड (Housiey Keymansions Pvt. Ltd. Entity) या नामांकित कंपनीमध्ये रिलेशनशिप मॅनेजर या पदासाठी निवड झाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक ६.१२ लाख रुपयांचे वेतन पॅकेज मिळाले आहे. अशी माहिती अमृतवाहिनी एमबीए महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी. एम. लोंढे यांनी दिली.






