काका कोयटे यांच्या वाढदिवसानिमित्त ७५ रक्तदात्यांचे रक्तदान

काका कोयटे यांच्या वाढदिवसानिमित्त ७५ रक्तदात्यांचे रक्तदान
काका कोयटे यांच्या वाढदिवसानिमित्त ७५ रक्तदात्यांचे रक्तदान

Kopargaon vijay kapse दि २५ सप्टेंबर २०२६ : समता परिवाराचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत २३ सप्टेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. गेल्या १३ वर्षांपासून काका कोयटे यांच्या वाढदिवसानिमित्त २३ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिर घेण्याची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली. समता परिवाराचे सदस्य संदीप कोयटे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतो त्याच अनुषंगाने समता चॅरिटेबल ट्रस्टच्या पुढाकाराने लायन्स क्लब ऑफ कोपरगाव, लिओ क्लब ऑफ कोपरगाव, लिंगायत संघर्ष समिती आणि कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने समता पतसंस्थेच्या समता सभागृहात बुधवार दि १३ सप्टेंबर रोजी हे रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले.

यावेळी समता चॅरिटेबल ट्रस्ट, समता पतसंस्था, समता इंटरनॅशनल स्कूल, तालुका किराणा मर्चंट असोसिएशन, लायन्स क्लब ऑफ कोपरगाव, लिओ क्लब ऑफ कोपरगाव आणि लिंगायत संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचा प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर लायन्स क्लब ऑफ कोपरगावचे संदीप राशिनकर शिला संदीप राशिनकर यांनी रक्तदान करून शिबिरास प्रत्यक्ष सुरुवात केली.

रक्तदान हे केवळ सामाजिक कर्तव्य नसून गरजू व्यक्तीच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करणारे मानवतेचे कार्य आहे. ‘आपले रक्तदान—कोणासाठी तरी जीवदान’ या भावनेतून काका कोयटे यांच्या वाढदिवसानिमित्त हा समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. यंदा तब्बल ७५ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. तर समता परिवाराशी संलग्न असलेल्या समता इंटरनॅशनल स्कूल, समता पतसंस्था, समता चॅरिटेबल ट्रस्ट, सुधन गोल्ड लोन तसेच स्व. दादाप्पा खंडाप्पा कोयटे विद्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि हितचिंतकांनी रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
यावेळी समता पतसंस्थेचे संचालक कचरू मोकळ, दीपक अग्रवाल, गिरीश सोनेकर, लायन्स क्लब ऑफ कोपरगावचे अध्यक्ष सचिन भडकवाडे, किरण शिरोडे, सुमित भट्टड, माजी अध्यक्ष अक्षय गिरमे, राजेश ठोळे, राजेंद्र शिरोडे, आनंद लोढा, अभिनंदन शिंगी, बाळासाहेब ज्युरी, व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा, खजिनदार तुलसीदास खुबानी, सचिव प्रदीप साखरे, लिओ क्लब कोपरगावचे अध्यक्ष करण शहा, सम्यक फुलफगर, धीरज कराचीवाला, मानस नागरे आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते तर रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी लायन्स समता ब्लड सेंटरचे संचालक डॉ. इरफान खान, टेक्निकल सुपरवायझर अशर शेख, टेक्निशियन गिरीश जाधव, उज्वला आहेर, आकांक्षा, तेजस्विनी, हबीब शेख आणि सागर बागुल यांनी सहकार्य केले.



