आपला जिल्हा

डॉ. सुजय विखे पाटील यांचा रोहित पवारांना सल्ला; “राजकारणात लक्ष्मणरेषा राहू द्या, महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा जपा

राजकारणात लक्ष्मणरेषा राहू द्या, महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा जपा

रोहित पवारांना माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचा सल्ला

राजकारणात लक्ष्मणरेषा राहू द्या, महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा जपा

रोहित पवारांना माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचा सल्ला

Ahilyanagar vijay kapse दि २६ सप्टेंबर २०२६ : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी माध्यमांमध्ये नेमके काय वक्तव्य केले, याची मला माहिती नाही. मात्र, ते एका सुसंस्कृत परिवारातून आलेले लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे राजकीय टीका करताना कौटुंबिक विषय माध्यमांसमोर आणू नयेत, अशी नम्र विनंती माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली.

जाहिरात

डॉ. विखे पाटील म्हणाले, पवार परिवाराने किंवा विखे पाटील परिवाराने कधीही कौटुंबिक विषय माध्यमांसमोर आणण्याचे काम केले नाही. आमचा परिवार छोटा आहे. मात्र, त्यांच्या कौटुंबिक विषयांवर मी बोलायला लागलो, तर त्याची किती मोठी चर्चा होऊ शकते, याचा विचार आपण करू शकतो. आम्ही सभ्यता आणि सुसंस्कृतपणा पाळतो आणि त्यांनीही तो पाळावा, अशी अपेक्षा आहे.

आमच्यावर राजकीय टीका करा, आमच्या कार्यपद्धतीवर टीका करा, सरकारच्या कामावर टीका करा; मात्र कौटुंबिक वादामध्ये पडू नका, असेही डॉ. विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

जाहिरात

ते पुढे म्हणाले की, कोणी म्हणत असेल की जनतेने याचा विचार केला पाहिजे, तर एवढेच सांगू इच्छितो की, आम्ही आज पक्षांतर केले असेल किंवा आमच्याबाबत काहीही राजकीय भूमिका असतील, तरी मागील पाच विधानसभा निवडणुकांमध्ये जनतेने आम्हाला महाराष्ट्रातील पहिल्या पाच मताधिक्यांमध्ये स्थान दिले आहे. त्यामुळे कोणाच्या बोलण्याने आम्ही मोठे किंवा लहान होणार नाही.

जनसामान्यांचे कल्याण करणे हे आमचे काम असून, मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र आणि अहिल्यानगर जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी आम्ही काम करत राहू, असे त्यांनी सांगितले.

जाहिरात

महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा जपण्याची जबाबदारी केवळ माझी नाही, तर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रत्येक लोकप्रतिनिधीची आहे. राजकीय टीका करताना ती कौटुंबिक टीकेत रूपांतरित होऊ नये, हीच माझी अपेक्षा आहे. अन्यथा राजकारणात कोणतीही मर्यादा किंवा लक्ष्मणरेषा उरणार नाही आणि त्यातून गलिच्छ राजकारण निर्माण होईल. असे राजकारण महाराष्ट्राच्या वैचारिक आणि सुसंस्कृत परंपरेला निश्चितच शोभणार नाही, असे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी म्हटले.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे